महाराष्ट्र

maharashtra

Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी 2चे गाणे रिलीज, रफ्तारसोबत थिरकला सलमान

By

Published : Jun 9, 2023, 4:25 PM IST

'बिग बॉस ओटीटी 2'चे गाणे प्रदर्शित हे झाले. या गाण्यात सलमान खान हा रफ्तारच्या रॅपवर डान्स करताना दिसत आहे. सलमानसोबत या गाण्यात रफ्तार देखील दिसत आहे.

Bigg Boss OTT 2
बिग बॉस ओटीटी 2

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी 2'चे गाणे आता प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेता सलमान खान हा रफ्तारच्या रॅपवर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात सलमानसोबत रॅपर रफ्तार देखील दिसत आहे. या सीझनमध्ये गेमवर पुर्ण नियंत्रण जनतेच्या हातात असणार आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान बिग बॉस ओटीटी 2 होस्ट करणार असून यावेळी बिग बॉस ओटीटी 2 या शोमध्ये खूप काही वेगळे पाहायला मिळणार आहे. बिग बॉस ओटीटी 2, मल्टी-कॅम अ‍ॅक्शनसह 24×7 नॉन-स्टॉप मनोरंजन हे प्रेक्षकांना मोफत मिळणार आहे. यापुर्वी जीओ सिनेमाने 'लगी बच्ची है' या गाण्याची दुसऱ्या सीझनची एक छोटी क्लिप जारी केली होती.

बिग बॉस ओटीटी 2 : बिग बॉस ओटीटी 2 हा शो फार जास्त लोकप्रिय असल्याने या शोवर प्रेक्षकांची फार नजर असणार आहे. यावेळी प्रेक्षक हे रिअल टाइममध्ये घरातील सहकाऱ्यांशी संवाद साधू शकणार आहे याशिवाय प्रेक्षक साप्ताहिकच्या रेशनिंग, स्पॉट रिमूव्हल आणि टास्क निर्णय यासारख्या परिणामांवर देखील हस्तक्षेप करू शकणार आहे. इतकेच नाही तर बिग बॉस बिग बॉस ओटीटी 2 मल्टीकॅमेरा स्ट्रीमिंगसह एक जबरदस्त अनुभव देण्याचे काम करणार आहे, यामुळे घरात काय सुरू आहे आणि कुठे काय घडत आहे हे प्रेक्षक कॅमेरा स्विच करून बघु शकणार आहे. याशिवाय, प्रेक्षकांना लाइव्ह चॅट आणि इमोजीद्वारे रिअल-टाइममध्ये प्रतिसाद देता येणार आहे. तसेच याव्यतिरक्त प्रेक्षकांना घराचे वेगवेगळे भाग रिअल टाइममध्ये पाहता येतील. यावेळी संभाषण काम एका नवीन स्तरावर नेले जाणार आहे.

सलमानसोबत झळकला रफ्तार : घराच्या आत 360-डिग्री कॅमेरा व्ह्यूसह, प्रेक्षक 1000+ तासांच्या लाइव्ह प्रोग्रामिंगचा, अनन्य कट्सचा आणि घरातून चोवीस तास ड्रॉप-इनचा आनंद घेवू शकणार आहे. बिग बॉस ओटीटी 2 बद्दल बोलताना, सलमान खानने म्हटले 'भारत नेहमीच नॉनस्टॉप मनोरंजनाच्या शोधात असते, आणि बिग बॉस ओटीटी 2 नेमके ते प्रदान करण्यासाठी येथे आहे! हा सीझन, माझ्याप्रमाणेच, रॉ आणि फिल्टर केलेले असेल, ज्यामुळे ते फार खूप छान वाटेल. हा चांगला मॅच आहे 'राम मिलाई जोडी,' असे त्याने म्हटले.

हेही वाचा :

  1. Akshay Kumars OMG 2 : ओटीटीवर नाही तर थिएटरमध्ये झळकणार ओएमजी २, अक्षय कुमारने जाहीर केली तारी

ABOUT THE AUTHOR

...view details