महाराष्ट्र

maharashtra

मलायकावरुन ट्रोल होणारा अर्जुन म्हणाला, "ट्रोल करणारे सेल्फीसाठीही तळमळतात"

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 1:02 PM IST

Updated : Dec 14, 2023, 3:19 PM IST

Arjun Kapoor breaks silence on trolling : अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा यांच्या वयामध्ये 12 वर्षाचा फरक असल्यामुळे दोघांनाही नेहमी ट्रेल केलं जातं. याबद्दल अर्जुननं बिनधास्त भाष्य केलं. तो म्हणाला, "हे ट्रोल करणारे लोकच आमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही तळमळत असतात."

Arjun Kapoor breaks silence on trolling
अर्जुन कपूरला मलायकावरुन केलं जातं ट्रोल

मुंबई - Arjun Kapoor breaks silence on trolling : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं सुरुवातील लपून छपून भेटणं सुरू होतं. नंतर त्यांनी डेट करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणांवर ते बिनधास्त फिरताना दिसले. यावर अरबाज खानपासून मलायकाला दूर केल्याचा आरोपही त्याच्यावर होत होता. मात्र, मलायका त्याच्यासोबत ठाम असल्यानं त्यानं कोणत्याही टीकेला महत्त्व दिलं नाही. अखेर 2019 मध्ये त्यांनी आपलं नातं इन्स्टाग्रामवर अधिकृत केलं.

गुरुवारी प्रसारित होणाऱ्या 'कॉफी विथ करण' शोच्या 8 व्या एपिसोडमध्ये करणसमोर बसून अर्जुन कपूर गप्पा मारणार आहे. यावेळी त्यानं मलायकासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल ट्रोल झाल्याबद्दल खुलासा केला. तिचे आधी अरबाज खानसोबत लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगाही आहे.

त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांच्या नात्यात काहीही फरक पडत नाही, असेही यावेळी अर्जुनने सांगितले. यावर्षी मलायका 50 वर्षांची झाली आहे, तर अर्जुन 38 वर्षांचा आहे. जेव्हा कॉफी विथ करणचा होस्ट करण जोहरने विचारले की ट्रोलर्स त्यांच्या नात्याबद्दल कसे बोलतात, याचा तुला त्रास झाला आहे का?, तेव्हा अर्जुन म्हणाला, "तुमच्यावर परिणाम होईल हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याच्यावर अशा गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही. परंतु आपण त्याला कसे सामोरे जातो यावर सर्व काही अवलंबून आहे."

"जे लोक ट्रोल करत असतात, तुम्हाला हे देखील माहित असतं की ते फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पूर्वी मी जरा घाबरायचो आणि नेहमी प्रतिक्रिया द्यायचो. तेव्हा मला जाणवलं की याचा त्रास करुन घेण्यात काहीच मतलब नाही. " यावर करण स्वतःबद्दल बोलताना मोकळेपणानं सांगिकतलं की, तो सिंगल पॅरेंट झाल्यामुळे केवळ त्यालाच नाही तर त्याची आई हिरू जोहरलाही या कृत्यामुळे ट्रोल केलं जातं. करण जोहरला त्याच्या फॅशन सेन्स आणि बॉडी शेमसाठीही कसे ट्रोल केले जाते याबद्दलही चित्रपट करणने सांगितले. 'तुम्हाला या ट्रोल्सची कीव करावी लागेल', असे तो म्हणाला.

तेव्हा अर्जुन म्हणाला, 'हे तेच लोक आहेत जे तुझ्यासोबत सेल्फी काढतील. जेव्हा ते तुम्हाला शूटवर पाहतात, तेव्हा हेच लोक तुमच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी देखील उत्सुक असतात.'

ऑगस्ट महिन्यामध्ये अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या वावड्या उडाल्या होत्या. मात्र, दोघांनीही मुंबईत अनेक वेळा डेटसाठी बाहेर पडून सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

हेही वाचा -

1. 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये आदित्य रॉय कपूरनं 'आशिकी 3'बद्दल दिली 'ही' प्रतिक्रिया

2.आलिया भट्टनं जिवलग मैत्रिणीच्या हळदी समारंभात लावली हजेरी, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

3.मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं कलावंत गौतमी पाटील

Last Updated : Dec 14, 2023, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details