महाराष्ट्र

maharashtra

सलमान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 1:29 PM IST

Tiger 3 box office collection day 6 : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या टायगर 3 चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस कमाईच्या रकमेत मोठी भर पडेल असा अंदाज आहे. जागतिक स्तरावर टायगर 3 नं चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा ओलांडलाय.

Tiger 3 box office collection day 6
टायगर 3 नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला

मुंबई - Tiger 3 box office collection day 6 : मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालंय. यातील सलमान खान साकारत असलेला टायगर आणि कतरिना कैफनं रंगवलेली झोया ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतं.

12 नोव्हेंबर रोजी दिवाळीला रिलीज झालेल्या या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटानं अगदी सहज गतीनं 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी चांगली आहे त्यामुळे प्रेक्षकांचा ओघ थिएटरकडे कायम आहे. 'टायगर 3' नं पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांची कमाई केली. सहाव्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये कायम आहे आणि संमिश्र प्रतिसाद असला तरी प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. आता, चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर एक नजर टाकूयात.

'टायगर 3' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय फ्रँचायझीमधला पाचवा चित्रपट आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 6 व्या दिवशी चित्रपटानं 13 कोटी रुपये कमवलेत. त्यामुळे चित्रपटाचं एकूण कलेक्शन 200.65 कोटी रुपये झालंय. एक आठवडा लवकरच पूर्ण होत असल्याने, या आठवड्याच्या अखेरीस कमाईच्या रकमेत मोठी भर पडेल असा अंदाज आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा ओलांडलाय.

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण' नंतर 'टायगर 3' हा याशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये नवीन जोडलेला चित्रपट आहे. सलमान खाननं यात अविनाश आणि झोयाच्या भूमिकेत कतरिना कैफनं प्रेक्षकांना भुरळ घातलीय. आदित्य चोप्राने निर्मिती केलेल्या या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेता हृतिक रोशन यांचा कॅमिओ देखील आहेत.

'टायगर 3' साठी संगीतकार प्रीतमनं साउंडट्रॅक तयार केला आहे, तर तनुज टिकूने बॅकग्राउंड स्कोअर बनवलाय. अ‍ॅक्शन पॅक्ड असलेला हा चित्रपट अंदाजे 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. यशराज फिल्म्सचा आजपर्यंतचा हा सर्वात महागडा चित्रपट आहे. सध्या वर्ल्ड कपचे सामने सुरू आहेत. यामध्ये भारतीय संघ फुल्ल फॉर्ममध्ये असून रविवारी ऑस्ट्रेलियासोबत अंतिम सामना खेळत आहे. त्यामुळे वर्ल्डकपचे सामने संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक टायगर 3 पाहायला थिएटरकडे वळतील,असा विश्वास सलमानं व्यक्त केलाय.

हेही वाचा -

1. यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार, सलमान खानचा विश्वास

2.भारत भेटीत डेव्हिड बेकहॅमनं गाठीला बांधला नात्यांचा गोतावळा

3.चौथ्यांदा मिळणार का भारतीय सुंदरीला 'मिस युनिव्हर्स'चा क्राऊन, स्पर्धेचा तपशील जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details