यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार, सलमान खानचा विश्वास

यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार, सलमान खानचा विश्वास
India will win World Cup : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहदमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारत जिंकणार असा विश्वास सलमान खाननं बोलून दाखवलाय. मुंबईत चाहत्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यकर्मात तो बोलत होता.
मुंबई - India will win World Cup :यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा सामना भारतच जिंकणार असा विश्वास सुपरस्टार सलमान खानने शुक्रवारी व्यक्त केलाय. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'टायगर 3' च्या एका फॅन इव्हेंटमध्ये सलमानने क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भात भाष्य केलं. सलमान म्हणाला, "प्रत्येक सामना भारतानं जिंकलाय आणि त्याच दरम्यान आम्ही 'टायगर 3' घेऊन आलो. तर आमचं जे कलेक्शन झालंय ते खूप चांगल आहे. आता भारत वर्डकप जिंकेल आणि त्यांनंतर तुम्ही लोक थिएटरमध्ये पुन्हा परतणार.", असे सलमान म्हणताच चाहत्यांनी भरपूर जल्लोष केला. .
सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. यात इमरान हाश्मीचीही प्रमुख भूमिका आहे.
रविवारी अहमदाबादमध्ये मेन इन ब्लूची ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. 2023 नंतर 20 वर्षांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच उभे ठाकलेत. 20 वर्षापूर्वी झालेल्या पराभवाचं उट्टं काढण्याची संधी आता भारतीय संघाकडे चालून आलीय. यंदाच्या स्पर्धेत भारताचा संघ अजिंक्य राहिला आहे. प्रत्येक समान्यात भारतीय खेळाडूंनी सांघीक खेळाचं उत्तम प्रदर्शन केलंय. सर्वच खेळाडूंचे फॉर्म सध्या उत्तम आहेत. त्यामुळे हा वर्ल्डकप भारतीय संघ जिंकणार याची खात्री सर्वांना वाटतेय. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक चिवट प्रदर्शनासाठी ओळखला जातो. दबाव असताना झुंझार खेळी करण्याची त्यांच्याकडे आगळी हातोटी आहे. त्यामुळे दोन्ही संघात रविवारी खेळला जाणारा सामना चुरशीचा होणार हे वेगळं सांगायची गरज नाही.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती . या सामन्यात भारतासाठी मोहम्मद शमीने सात विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला होता.
गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या चुरशीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली. आता रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहदमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव .
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
हेही वाचा -
