ETV Bharat / entertainment

चौथ्यांदा मिळणार का भारतीय सुंदरीला 'मिस युनिव्हर्स'चा क्राऊन, स्पर्धेचा तपशील जाणून घ्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 5:32 PM IST

Miss Universe 2023: प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा मिस युनिव्हर्स 2023 ची ग्रँड फिनाले शनिवारी एल साल्वाडोर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत भारताचं कोण प्रतिनिधीत्व करतंय आणि फिनालेमध्ये कोणती आकर्षणे आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Miss Universe 2023:
मिस युनिव्हर्स 2023 ची ग्रँड फिनाले

मुंबई - Miss Universe 2023: मिस युनिव्हर्स स्पर्धची 72 वी आवृत्तीबद्दलची उत्सुकता ताणली आहे. 18 नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर येथे होणाऱ्या या स्पर्धेमध्ये जगभरातील 90 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये युनायटेड स्टेट्समधील आर'बॉनी गॅब्रिएल या गेल्या वर्षीचा मिस युनिव्हर्स नंतरची विजेतीचा शोध , वैयक्तिक विधाने, सर्वसमावेशक मुलाखती आणि गाउन आणि स्विमवेअरचे आकर्षक प्रदर्शन अशा अनेक कार्यक्रमांच्या मालिकेतून उलगडेल.

प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर्स जीनी माई जेनकिन्स आणि मारिया मेनुनोस माजी मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कल्पोसोबत या प्रतिष्ठित स्पर्धेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

या कार्यक्रमात 12 वेळा ग्रॅमी विजेते जॉन लीजेंड यांचा लाईव्ह म्यूझिक परफॉर्मन्स या प्रसंगाचे ग्लॅमर आणखी वाढवेल. आगामी ग्लोबल ब्युटी व्कीनच्या क्राऊनची जग आतुरतेने वाट पाहत असताना, ही अविस्मरणीय रात्र आपल्या अभिजात आणि प्रतिभेनं जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.

यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी यजमान देश म्हणून एल साल्वाडोरची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण सॅन साल्वाडोरच्या राजधानीतील जोसे अॅडॉल्फो पिनेडा अरेना असेल. या सभागृहात 13 हजार लोकांच्या प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. राष्ट्रीय वेशभूषा स्पर्धा 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता पार पडली आहे.

७२ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्वेता शारदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 22 वर्षीय मॉडेल आणि नृत्यांगना असलेली श्वेता ही मूळची चंदिगडची आहे आणि तिनं मिस दिवा युनिव्हर्स 2023 चा मुकुट पटकावला आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी ती तिच्या आईसोबत मुंबईला स्थलांतरित झालीय. श्वेताने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तिचे अंडरग्रेजुएट शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलंय आणि डान्स दिवाने, डान्स प्लस आणि डान्स इंडिया डान्स यांसारख्या लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेऊन तिला ओळख मिळाली निर्माण केलीय. याशिवाय झलक दिखलाजा या डान्स रिएालिटी शोमध्ये तिने नृत्यदिग्दर्शक म्हणून आपले कौशल्य दाखवले आहे.

हरनाझ कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा जिंकून भारताला अभिमान वाढवला होता. 13 डिसेंबर रोजी 2021 ला तिने 70 वी मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा जिंकून तिनं लारा दत्ता (2000) आणि सुष्मिता सेन (1994) 21 वर्षांनंतर सौंदर्य स्पर्धा जिंकणारी हरनाझ तिसरी व्यक्ती ठरली होती.

हेही वाचा -

  1. दीपिका पदुकोण रणवीर सिंग युरोप दौऱ्यावरुन मुंबईला परतले, रणबीर कपूरही झाला स्पॉट

2. डेव्हिड बेकहॅमसोबतच्या फोटोवरुन खिल्ली उडवणाऱ्या हर्षवर्धन कपूरनं दिलं शांत उत्तर

3. रश्मिका मंदान्ना डीपफेक वादानंतर केंद्र सरकार गंभीर, सोशल मीडिया दिग्गजांना चर्चेसाठी आमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.