महाराष्ट्र

maharashtra

'टायगर 3'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'ब्रह्मास्त्र'ला टाकले मागे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 1:08 PM IST

Updated : Nov 29, 2023, 3:59 PM IST

Tiger 3 box office collection day 17 : मनिष शर्मा दिग्दर्शित सलमान खानच्या 'टायगर 3'नं कमाईच्या बाबतीत 'ब्रह्मास्त्र'ला मागे टाकले आहे. या चित्रपटानं अवघ्या 16 दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.

Tiger 3 box office collection day 17
टायगर 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 17

मुंबई - Tiger 3 box office collection day 17 : सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर 'टायगर 3' अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं आज 28 नोव्हेंबर रोजी रिलीजच्या 17व्या दिवसात प्रवेश केला आहे. 'टायगर 3'नं जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. देशांतर्गत कमाईत हा चित्रपट जवळपास 300 कोटीच्या जवळपास पोहचला आहे. 'टायगर 3'नं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र'ला कमाईमध्ये मागे टाकले आहे. 'टायगर 3' आता होम प्रोडक्शन यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'वॉर' चित्रपटाचा कमाईचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झालाय.

'टायगर 3' आणि 'ब्रह्मास्त्र' : अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपट 7 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. याशिवाय या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ होता. 'ब्रह्मास्त्र' हा रणबीर कपूरच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात हिट आणि कमाई करणारा सिनेमा ठरला. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटानं जगभरात 430 कोटीची कमाई केली आहे. 'टायगर 3'नं तीन आठवडे पूर्ण होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र'चा कमाईचा विक्रम मोडला आहे. 'टायगर 3'नं आतापर्यंत जगभरात 447 कोटींची कमाई केली आहे.

'टायगर 3' 17व्या दिवशी किती करेल कमाई : 'टायगर 3'नं 16 व्या दिवशी 2.66 कोटीची कमाई केली. देशांतर्गत या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 273.8 कोटी रुपये झाले आहे. दरम्यान 17व्या दिवशी हा चित्रपट 33 लाखची कमाई करेल, असा अंदाज लावल्या जात आहे. आता 'टायगर 3'ला टक्कर देण्यासाठी विकी कौशलचा 'सॅम बहादूर' आणि रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा रुपेरी पडद्यावर 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'टायगर 3'साठी कमाई करणं आणखी कठीण होईल.

हेही वाचा :

  1. फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात केलं दाखल
  2. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं पतीला घर सोडण्याचा दिला इशारा
  3. 'द आर्चीज' : सुहाना खाननं 'जब तुम ना थीं' गाण्यातून केलं गायनात पदार्पण
Last Updated : Nov 29, 2023, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details