महाराष्ट्र

maharashtra

Shah Rukh Khan : दुबईवरून महागडे घड्याळे आणणे शाहरुख खानला पडले महागात; मुंबई एअरपोर्टवर अडवले

By

Published : Nov 12, 2022, 4:30 PM IST

Updated : Nov 15, 2022, 1:07 PM IST

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून शाहरुख खानची तासभर चौकशी ( Shah Rukh Khan was interrogated customs department ) करण्यात आली. कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल विभागाने शाहरुख आणि त्याच्या टीमची चौकशी ( Shahrukh and his team investigate ) केल्याचे समजते.शाहरुख खानच्या बॅगेत महागड्या घड्याळांचे ( Expensive watch in Shah Rukh Khan bag ) रिकामे बॉक्स सापडल्यानंतर शाहरुखची चौकशी करण्यात आली.

शाहरुख खान
शाहरुख खान

मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानबाबत पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून शाहरुख खानची तासभर चौकशी ( Shah Rukh Khan was interrogated customs department ) करण्यात आली. कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुख आणि त्याच्या टीमची चौकशी करण्यात आली आहे. शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत विमानतळावर होती तर दुसरीकडे कस्टम विभाग शाहरुखच्या बॉडीगार्ड आणि टीमची चौकशी करण्यात व्यस्त ( Shahrukh and his team investigate ) होता. शाहरुख खानने कस्टम ड्युटीची रक्कम भरली ( Shah Rukh Khan paid the amount of customs duty ) आहे. शाहरुख खानच्या बॅगेत महागड्या घड्याळांचे ( Expensive watch in Shah Rukh Khan bag ) रिकामे बॉक्स सापडल्यानंतर शाहरुखची चौकशी करण्यात आली.

काय आहे प्रकरण? - शाहरुख खान त्याच्या टीमसोबत दुबईमध्ये खासगी चार्टर VTR - SG च्या बुक लॉन्च इव्हेंटसाठी गेला होता. काल रात्री 12 वाजता शाहरुख या खाजगी चार्टरने भारतात परतला. यादरम्यान, रेड चॅनल ओलांडत असताना सीमाशुल्क विभागाला शाहरुख आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये घड्याळे सापडली. अशा स्थितीत सर्वांना थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली.

भरली कस्टम ड्युटी -दरम्यान, बॅगमधून अनेक महागड्या घड्याळे जप्त करण्यात आली, ज्यात बाबून आणि झुर्बक आणि रोलेक्स घड्याळांचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे, ज्यांची किंमत सुमारे 8 लाख रुपये आहे. यासोबतच अॅपल सीरिजची घड्याळेही सापडली असून इतर घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले आहेत. या घड्याळांवर 17 लाख रुपयांहून अधिक कस्टम ड्युटी लावण्यात आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपये कस्टम ड्युटी भरली आहे. शाहरुखने ही रक्कम त्याच्या क्रेडिट कार्डद्वारे भरली आहे.

दुबईवरून आणले होते महागडे घड्याळे -मीडिया रिपोर्टनुसार, कस्टम विभागाला Babun & Zurbk घड्याळ, Rolex चे 6 पॉकेट Spirit ब्रँडचे घड्याळ, apple चे घड्याळही सापडले आहेत. यावर 17 लाख 56 हज़ार 500 रुपयांची कस्टम ड्यूटी लागू होत असल्याचे यावेळी कस्टम विभागाने सांगितले. त्यामुळे हा टॅक्स भरण्याची सूचना कस्टम विभागाने केली. जवळपास तासभर शाहरुख़ आणि कस्टम विभागात चर्चा झाली. त्यानंतर पूजा ददलानी व शाहरुख हे दोघेही विमानतळावरुन निघून गेले. मात्र, त्याचा बॉडीगार्ड आणि टीम तिथेच थांबले होते.

शाहरुख आला होता दुबईवरून - शाहरुखने लाखो रुपयांच्या किंमतीची घड्याळे मुंबईला आणली आहेत. तसेच, शाहरुखच्या बॅगेत घड्याळाचे रिकामे पॉकेटही मिळाले आले. त्यामुळे, कस्टम ड्युटी भरली नसल्याच्या संशयावरुन विमानतळावर कस्टम विभागाने शाहरुखला चौकशीसाठी थांबवले होते. शाहरुख आपल्या प्रायव्हेट चार्टर VTR - SG ने दुबईला एका कार्यक्रमासाठी गेला होता. त्याच विमानाने शाहरुख शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता मुंबई विमानतळावर परतला. यावेळी कस्टम विभागाला शाहरुख आणि त्याच्या टीमजवळ लाखो रुपयांच्या किंमतीची घड्याळे दिसून आली.

Last Updated : Nov 15, 2022, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details