महाराष्ट्र

maharashtra

Sand artist tribute to Satish Kaushik : सुदर्शन पट्टनायक यांनी शिल्प बनवून सतिश कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली

By

Published : Mar 10, 2023, 3:25 PM IST

सुदर्शन पट्टनायक यांनी ज्येष्ठ अभिनेता सतिश कौशिक यांचे पुरीच्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांवर वाळूचे शिल्प बनवले आहे. हे शिल्प पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अशा प्रकारे कौशिक यांना सुदर्शन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शिल्प बनवून सतिश कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली
शिल्प बनवून सतिश कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली

पुरी - प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पट्टनायक यांनी ज्येष्ठ अभिनेता सतिश कौशिक यांचे पुरीच्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोर्ट्रेट बनवून त्यांना विशेष आदरांजली वाहिली. बुधवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने कौशिक यांचे निधन झाले होते. सुदर्शन यांनी दिवंगत अभिनेता सतिश कौशिक यांच्या शिल्पाशेजारी 'सतीश कौशिक यांना श्रद्धांजली, असे लिहिले आहे. सामान्य लोकांनी या विशेष वाळू कलेला मोठ्या संख्येने भेट दिली आहे. एनएनआयशी बोलताना सुदर्शन म्हणाले, 'सतीश कौशिकजी आता राहिले नाहीत. पण त्यांची कला कायम राहील. मी माझ्या सँड आर्टच्या माध्यमातून त्यांच्या कलेला आदरांजली वाहिली आहे.'

सतिश यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अतुलनीय होते. ते केवळ एक हरहुन्नरी अभिनेता नव्हते तर एक प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि सृजनशील निर्माता देखील होते. त्यांच्या अष्टपैलु व्यक्तीमत्वामुळे आणि अभिनयाच्या जादुने पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. सतीश कौशिक हे आपल्या अभिनयासोबतच एक विनम्र, दयाळू आणि संवेदनशील व्यक्ती होते. ते फिल्म इंडस्ट्रीतील अनेक तरुण अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात असत, ते नेहमी मदतीचा हात देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असत. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांना ओळखणाऱ्यांसाठी आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. सर्वच थरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या वाळू शिल्प कला स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सँड आर्टिस्ट सुदर्शन पट्टनायक यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आत्तापर्यंत, सुदर्शन पटनायक यांनी 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय सँड आर्ट चॅम्पियनशिप तसेच महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी अशा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व तर केलेच पण देशासाठी अनेक बक्षिसेही जिंकली आहेत. कलाकार प्रत्येक वेळी सामाजिक संदेश देण्यासाठी आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीचा वापर करतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. 48 फूट उंच वाळूचा किल्ला बनवण्याचा गिनीज रेकॉर्ड (2017) त्याच्या नावावर आहे.

हेही वाचा -Actress Watching The Sunset : अभिनेत्री दिशा पटानी, सोनम बाजवा आणि मौनी रॉय यांच्या सुर्यस्ताला पाहून खुलल्या कळ्या

ABOUT THE AUTHOR

...view details