महाराष्ट्र

maharashtra

'टायगर-3'च्या सेटवरील सलमान खान आणि शाहरुख खानचे फोटो व्हायरल

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 5:37 PM IST

Salman khan and shahrukh khan : 'टायगर-3'च्या सेटवरील सलमान खान आणि शाहरुख खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भाईजानच्या या चित्रपटात किंग खाननं कॅमिओ केला आहे.

Salman khan and shahrukh khan
सलमान खान आणि शाहरुख खान

मुंबई - Salman khan and shahrukh khan : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'टायगर-3' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटमध्ये खूप अ‍ॅक्शन सीन्स आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं कॅमियो केला आहे. हा कॅमियो अनेकांना खूप आवडला. दरम्यान या चित्रपटाच्या सेटवरील सलमान खान आणि किंग खानचे ऑफ स्क्रिन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोन्ही स्टार आपल्या स्टंट मॅनबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. शाहरुख खान आणि भाईजानचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करून या दोन्ही सुपरस्टारवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सलमान खान आणि शाहरुख खानचे फोटो : व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहिलं, ''हा फोटो खूप सुंदर आहे, याशिवाय मला दोन्ही चित्रपट खूप आवडले आहेत''. दुसऱ्या एकानं लिहिलं की, ''शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट खूप जबरदस्त असणार आहे, मी या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे''. आणखी एकानं लिहिलं, ''शाहरुख खानच्या 'पठाण'नं जोरदार कमाई केली होती''. या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. याशिवाय काहीजणांनी या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. सलमाननं किंग खानच्या 'पठाण'मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती. ही भूमिका अनेकांना आवडली होती.

'टायगर-3' आणि 'पठाण'ची जबरदस्त कमाई : सलमान खान आणि शाहरुख खानला 'टायगर-3' मध्ये स्टंट करताना दाखवण्यात आले आहे. दरम्यान 'टायगर-3'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जगभरात 463 कोटींची कमाई केली आहे. आता देखील हा चित्रपट 500 कोटीचा आकडा पार करण्याची वाटचाल करत आहे. दुसरीकडे 'पठाण' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं जगभरात 1,050.30 कोटीची कमाई केली. 'पठाण' हा 2023 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. याशिवाय किंग खानच्या 'जवान'नं देखील रुपेरी पडद्यावर धमाल केली आहे. आता अनेक चाहते शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. विद्युत जामवालनं हिमालयात साजरा केला वाढदिवस, जंगलामधील टारझनच्या लूकमधील फोटो केला शेअर
  2. प्रतिक्षा संपली! जितेंद्र कुमारच्या 'पंचायत 3' वेब सीरीजचा फर्स्ट लुक केला प्रदर्शित
  3. रिलेशनशिपमध्ये असताना मुनावर फारुकीनं काय केलं? अभिनेत्री आयेशा खाननं 'हा' केला गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details