ETV Bharat / entertainment

रिलेशनशिपमध्ये असताना मुनावर फारुकीनं काय केलं? अभिनेत्री आयेशा खाननं 'हा' केला गंभीर आरोप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 11:24 AM IST

Bigg Boss 17 : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी सध्या बिग बॉसमुळं चर्चेत आहे. दरम्यान आता एका अभिनेत्रीनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय आहे आरोप हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Bigg Boss 17
बिग बॉस 17

मुंबई - Bigg Boss 17 : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी सध्या बिग बॉसमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये त्याला खूप पसंत केले जात आहे. मुनावरची फॅन फॉलोइंग खूप आहे. मुनावर हा नाझिला सिताशीसोबत ओपन रिलेशनशिपमध्ये आहे. अभिनेत्री आयशा खाननं मुनवर फारुकीवर डबल डेटींगचा आरोप केला आहे.

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना आयशा म्हटलं होत की, सध्या बिग बॉसमध्ये एक स्पर्धक आहे. ज्यानं मला एका म्युझिक व्हिडिओसाठी मेसेज केला होता. मी त्याला ओळखते, म्हणून मी म्युझिक व्हिडिओला हो म्हटलं होतं. हा व्हिडिओ बनवता आला नाही. पण तो माझ्यावर प्रेम करत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर मलादेखील तो हळूहळू आवडू लागला. यानंतर आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आलो. मला माहित होते की तो रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्यानं मला सांगितलं होतं की त्याचं ब्रेकअप झालं आहे.

आयशा खाननं केला खुलासा : आयशानं पुढं सांगितले की, जेव्हा तो बिग बॉसमध्ये जात होता, तेव्हा मी त्याचा गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पाहिला. तेव्हा मला समजले की तो माझ्यासोबत असताना दुसऱ्या मुलीला डेट करत आहे. त्यानंतर मी त्याच्या मैत्रिणीशीही बोलले. तिनं मला सांगितलं की बिग बॉसमधून आल्यानंतर तो तिच्याशी लग्न करेल. आयशा खाननं या पॉडकास्टमध्ये मुनावरचं नाव घेतलं नाही.

'लॉकअप' शोमध्ये मुनावर फारुकी : 'बिग बॉस 17' व्यतिरिक्त मुनावर फारुकी हा 'लॉकअप' शोमध्ये दिसला आहे. या शोचा तो विजेता ठरला होता. 'लॉकअप' शो दरम्यान मुनावरचं नाव अंजली अरोरासोबत जोडले गेले होते. या शोमध्ये अंजलीनं मुनावरला खूप पाठिंबा दिला होता. हा शो होस्ट कंगना रनौतनं केला होता. 'लॉकअप' शो खूप लोकप्रिय झाला होता. या शोमधून मुनावर हा प्रसिद्धी झोतात आला होता.

हेही वाचा :

  1. अश्वत्थामाची भूमिका साकारणार शाहिद कपूर, विकी कौशलचा पत्ता कट
  2. विकी कौशलनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त केला शेअर व्हिडिओ
  3. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'चा जगभर डंका, पाहा किती केली कमाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.