ETV Bharat / entertainment

विद्युत जामवालनं हिमालयात साजरा केला वाढदिवस, जंगलामधील टारझनच्या लूकमधील फोटो केला शेअर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 2:28 PM IST

Vidyut Jamwal birthday :अभिनेता विद्युत जामवाल हा 10 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करत आहे. त्यानं काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.

Vidyut Jamwal  birthday
विद्युत जामवालचा वाढदिवस

मुंबई Vidyut Jamwal birthday : 'बुलेट राजा', 'कमांडो', 'कमांडो 2' आणि 'कमांडो 3' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शन आणि खतरनाक स्टंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता विद्युत जामवाल आज, 10 डिसेंबर रोजी 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. विद्युत जामवाल हा हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. विद्युतनं 25 हून अधिक देशांमध्ये लाइव्ह अ‍ॅक्शन शो केले आहेत. याशिवाय तो अ‍ॅक्शन आणि मार्शल आर्टमध्ये परफेक्ट आहे. त्याच्यासाठी फिल्मी दुनियेत करिअर करणं हे सोपे नव्हतं. त्याच्या चित्रपटामधील त्याचे अ‍ॅक्शन सीन्स अप्रतिम आहेत.

विद्युत जामवालचा वाढदिवस : विद्युतनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर त्यानं अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. विद्युतनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ सिनेमातून केली होती. 2012 मध्ये आलेला 'शक्ती' हा त्याचा पहिला डेब्यू चित्रपट होता. त्यानंतर याच वर्षात त्यानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. बॉलीवूडमधील ऑडिशननंतर त्याला 'फोर्स' चित्रपट मिळाला. या चित्रपटाद्वारे त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम दिसला होता. या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स होते. त्या सीन्सला खूप पसंती मिळाली. या चित्रपटासाठी विद्युतला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

विद्युतनं शेअर केले फोटो : विद्युतनं या खास प्रसंगी हिमालय पर्वत रांगेतील काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो डोंगर आणि जंगलात टारझन अवतारात एकांताचा आनंद लुटताना दिसत आहे. याशिवाय त्यानं या फोटोवर एक सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं पुढच्या अध्यायासाठी तयार आणि उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. त्याचा 'क्रॅक' हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. दरम्यान विद्युत हे इंस्टाग्रामवरील फोटो न्यूड आहेत. अनेकांनी त्याचे न्यूड फोटो पाहून त्याची तुलना रणवीर सिंगसोबत केली आहे. एका यूजरनं लिहिलं, ''वाढदिवसाच्या शुभेच्छा''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''जंगलात राहणे हीच गोष्ट माणसाला त्याच्या उत्पत्तीशी जोडते''. आणखी एका यूजरनं लिहिलं की, ''असं केले तर रणवीर सिंग काय करेल?'' अशा अनेक कमेंट या फोटोवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. 'दिल चाहता है' आयकॉनिक चित्रपटला 23 पूर्ण, फरहान अख्तरनं शेअर केला खास फोटो
  2. रिलेशनशिपमध्ये असताना मुनावर फारुकीनं काय केलं? अभिनेत्री आयेशा खाननं 'हा' केला गंभीर आरोप
  3. अक्षय कुमार, शाहरुख खानसह अजय देवगण अडचणीत, 'या' प्रकरणात लखनौ उच्च न्यायालयानं बजावली नोटीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.