महाराष्ट्र

maharashtra

Jr NTR dodges body double : 'वॉर 2'मध्ये बॉडी डबल न वापरता ज्युनियर एनटीआर स्वतःच करणार अ‍ॅक्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 5:32 PM IST

Jr NTR dodges body double : ज्युनियर एनटीआर 'वॉर 2' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार असून या हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्ससाठी तो बॉडी डबल वापरणार नाही. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटासाठी तो स्वतः अ‍ॅक्शन सीक्वेन्स करण्यावर ठाम आहे.

Jr NTR dodges body double
'वॉर 2'मध्ये ज्युनियर एनटीआर

मुंबई - Jr NTR dodges body double : 'वॉर 2' या अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटात ज्युनियर एनटीआर जबरदस्त स्टंट्स सीन करण्यासाठी सज्ज झालाय. विशेष म्हणजे यासाठी तो बॉडी डबल्सचा वापर करणार नसल्याचं समजतंय. या चित्रपटात त्याची भूमिका आतापर्यंत त्यानं साकारलेल्या भूमिकाहून पूर्ण वेगळी असणार आहे. सध्या त्याच्या हातात असलेल्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करुन तो 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये सहभागी होईल. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.

अयान मुखर्जी या चित्रपटासाठी स्पेनमध्ये शूटिंग करत आहे. ज्युनियर एनटीआर सध्या 'देवरा: भाग 1' च्या शूटिंगमध्ये गुंतलाय. याचे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर तो 'वॉर'च्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. यशराज फिल्म्सच्या महत्त्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेला 'वॉर 2' या चित्रपटात स्वत:चे अ‍ॅक्शन सीन साकारण्यासाठी ओळखला जाणारा ज्युनियर एनटीआर खास स्टाईलमध्ये अवतरणार आहे. यात त्याची भूमिकाही खूप आक्रमक असल्याचं समजतंय. या चित्रपटातील सर्व अ‍ॅक्शन सीन्स तो बॉडी डबल न वापरता स्वतःच करणार आहे.

स्पाय थ्रिलर 'वॉर 2'च्या शूटिंगच्या अचूक तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. परंतु ज्युनियर एनटीआर एप्रिल महिन्यापासून सहभागी होऊ शकतो. सध्या तो 'NTR 31' या चित्रपटामुळे तारखा देऊ शकत नाही. 'वॉर 2' मध्ये त्याच्यासोबत काम करण्यासाठी आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांचा संभाव्य कास्टिंगमध्ये समावेश आहे. यशराज फिल्म्सच्या महिला गुप्तहेर चित्रपटात आलिया भट्ट आघाडीची भूमिका करणार असल्यामुळे 'वॉर 2' मध्ये ती कॅमिओ रोल करणार आहे.

सध्या, ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी 'देवरा: भाग १' या चित्रपटासाठी गोव्यामध्ये शूटिंग करतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरतला शिवा करत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटातून जान्हवी कपूर आणि सैफ अली खान दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत उतरणार आहेत. ज्युनियर एनटीआर सहकलाकार जान्हवी कपूर आणि सैफ अली खानसोबत गोव्यातील शूटिंग या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details