महाराष्ट्र

maharashtra

बॉबी देओल अभिनीत इराणी 'जमाल कुडू' गाण्याचा ऑडिओ ट्रॅक झाला रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 5:34 PM IST

Animal Bobby Deol Entry Song: 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये सध्या राज्य करत आहे. दरम्यान या चित्रपटामधील बॉबी देओल अभिनीत 'जमाल कुडू' या गाण्याचा ऑडिओ ट्रॅक रिलीज केला गेला आहे.

Animal Bobby Deol Entry Song
अ‍ॅनिमल चित्रपटातील बॉबी देओलची एंट्री

मुंबई - Animal Bobby Deol Entry Song: संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपट रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई करत आहे. हा रणबीर कपूरच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली. बॉबी देओलनं या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील बॉबी देओलचा अभिनय अनेकांना खूप आवडला आहे. 'अ‍ॅनिमल'मधील बॉबीवर अभिनीत गाणं ऑडिओ साउंडट्रॅक 6 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला आहे. बॉबीचं नवीन गाणं जमाल कुडू' हे चाहत्यांना खूप पसंत पडलं आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटामधील बॉबीचं गाणं : 'अ‍ॅनिमल' हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून बॉबी देओल हा खूप चर्चेत आहे. बॉबी देओलच्या दमदार अभिनयानं आणि धमाकेदार एंट्रीनं चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'जमाल कुडू' हे गाणं इराणी संगीताचं पारंपारिक गाणं आहे. सौनिक, हर्षिता, कीर्तना, वाघदेवी मेघना नायडू, सबिया, ऐश्वर्या दासरी आणि अभिक्य यांनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं टी-सीरीज म्युझिकनं तयार केलं आहे. 'अ‍ॅनिमल' रिलीज होण्यापूर्वीच 'जमाल कुडू' हे गाणं इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टॉपवर ट्रेंड करत होतं. या गाण्याबाबत आतापर्यंत अनेक रिल्स व्हिडिओ बनवले गेले आहेत, जे व्हायरल होत आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची स्टार कास्ट :'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल व्यतिरिक्त अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. दरम्यान बॉबी देओल आणि रणबीर कपूरच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच पुढं तामिळ चित्रपट 'कांगुवा', आणि 'हरि हारा वीरा मल्लू' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे रणबीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'रामायण पार्ट 1' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सुहाना, अनन्या आणि शनायानं बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर केला प्रेमाचा वर्षाव
  2. 'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर अर्शद वारसीनं केलं रणबीर कपूरचं कौतुक
  3. 'अफवाहों का 'सफर' बस यहीं तक': सनी देओलनं नशेतील व्हायरल व्हिडिओचं सांगितलं सत्य

ABOUT THE AUTHOR

...view details