महाराष्ट्र

maharashtra

Cauvery row protests: प्रकाश राजनं अभिनेता सिद्धार्थची 'कन्नडीगांच्या वतीने' मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 5:01 PM IST

Cauvery row protests: तमिळ अभिनेता सिद्धार्थ त्याच्या 'चिठ्ठा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुरुवारी बंगळूरमध्ये आला असताना त्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्याला कार्यक्रम सोडून जाणे भाग पडले. या घटनेबद्दल प्रकाश राजने कन्नडिगांच्यावतीने सिद्धार्थची माफी मागितली आहे.

Cauvery row protests
प्रकाश राजनं अभिनेता सिद्धार्थची 'कन्नडीगांच्या वतीने' मागितली माफी

मुंबई - Cauvery row protests: अभिनेता प्रकाश राजनं चित्रपट उद्योगातील सहकारी तमिळ अभिनेता सिद्धार्थची 'कन्नडीगांच्या वतीने' माफी मागितली आहे. सिद्धार्थ गुरुवारी बेंगळूरू येथे प्रमोशनसाठी आला अताना त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्यानं तो नाराज झाला होता. त्यामुळे सिद्धार्थला त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चिठ्ठा' या चित्रपटाचे प्रमोशन करताना पत्रकार परिषद मध्येच सोडावी लागली होती. प्रकाश राज यांनी एक्सवर सांगितले की, आंदोलकांनी कलाकारांना शिवीगाळ करण्यापेक्षा त्यांच्या तक्रारी निवडून आलेल्या राजकारण्यापर्यंत पोहोचवाव्यात.

आपल्या एक्स हँडलवर कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर करताना, प्रकाश यांनी ट्विट केलं आणि लिहिलं की, 'गेल्या दशकापासून भिजत पडलेला हा प्रश्न सोडवण्यात सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना अपयश आल्याबद्दल त्यांना प्रश्न करण्याऐवजी....केंद्रावर दबाव आणत नसलेल्या निरुपयोगी खासदारांना प्रश्न विचारण्याऐवजी. ...सामान्य माणसाला आणि कलाकारांना अशा प्रकारे त्रास देणे हे मान्य केले जाऊ शकत नाही.. कन्नडिगा म्हणून.. कन्नडिगांच्या वतीने क्षमा मागतो.'

गुरुवारी सिद्धार्थ बेंगळुरूमध्ये चिठ्ठा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी काही कन्नड समर्थक निदर्शकांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला आणि घोषणाबाजी करत कार्यक्रमात व्यत्यय आणला. त्यांनी सिद्धर्थला घटनास्थळ सोडण्याची मागणी केली आणि दावा केला की कावेरी पाणी वादाच्या दरम्यान त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची ही योग्य वेळ नाही.मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या पत्रकार परिषदेत अडथळा आणणारे लोक कर्नाटक रक्षण वेदिके या कन्नड ग्रुपचे सदस्य होते.

एस यू अरुण कुमार यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला,तमिळ भाषेतील चिठ्ठा या चित्रपटात सिद्धार्थ निमिषा सजयनसोबत भूमिका साकारत आहे. हा चित्रपट एका काका आणि त्याच्या भाचीची कथा पडद्यावर मांडतो. सिद्धार्थचा चिठ्ठा हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाला बहुतेक प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक रिव्ह्यू मिळाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details