महाराष्ट्र

maharashtra

Assam flood relief : आमिर खानने आसाममधील पूरग्रस्तांसाठी दिली २५ लाख रुपयांची देणगी

By

Published : Jun 29, 2022, 11:04 AM IST

आमिर खानने आसाममधील पूरग्रस्तांसाठी दिली २५ लाख रुपयांची देणगी
आमिर खानने आसाममधील पूरग्रस्तांसाठी दिली २५ लाख रुपयांची देणगी ()

आसाममध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत कूण 117 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 100 लोक पुरात मरण पावले, तर उर्वरित 17 लोक भूस्खलनामुळे मरण पावले. पुरग्रस्तांसाठी मदतीचाही ओघ सुरू असून अभिनेता आमिर खानने २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( Assam Chief Minister Himanta Biswa Sarma ) यांनी ट्विटरवर आमिरचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली - अभिनेता आमिर खानने ( Aamir Khan ) आसाममधील पूरग्रस्त ( people affected by floods ) मदत कार्यासाठी 25 लाख रुपयांची मदत केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( Assam Chief Minister Himanta Biswa Sarma ) यांनी ट्विटरवर आमिरचे आभार मानले आहेत.

"प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अमीर खान यांनी आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री मदत निधीसाठी 25 लाख रुपयांचे उदार योगदान देऊन मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या काळजीबद्दल आणि औदार्याच्या कृतीबद्दल माझे मनापासून आभार," असे सरमा यांनी ट्विट केले आहे. आमिरच्या या कृतीचे आसामसह देशभरातील चाहते कौतुक करीत आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या म्हणण्यानुसार, यावर्षी राज्यात पूर आणि भूस्खलनात एकूण 117 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 100 लोक पुरात मरण पावले, तर उर्वरित 17 लोक भूस्खलनामुळे मरण पावले.

एकट्या बारपेटा जिल्ह्यात 8.76 लाख लोक बाधित झाले आहेत, त्यानंतर नागावमध्ये 5.08 लाख, कामरूपमध्ये 4.01 लाख, कछारमध्ये 2.76 लाख, करीमगंजमध्ये 2.16, धुब्रीमध्ये 1.84 लाख आणि 1.70 लाख लोक बाधित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आसाममधील दारंग जिल्ह्यात याचा फटका बसला. भारतीय हवाई दलाने विविध पूरग्रस्त भागात सात प्रकारची स्थिर आणि रोटरी-विंग विमाने तैनात केली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

हेही वाचा -बॉबी देओलने साजरी केली वडिलांच्या हिट 'प्रतिज्ञा' चित्रपटाची 47 वर्षे

ABOUT THE AUTHOR

...view details