महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Accident Case : खारघर स्टेशननजीकच्या उड्डाणपुलावरून मिनी बस कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

By

Published : Aug 1, 2022, 7:57 AM IST

कळंबोलीवरून मीरा रोडकडे निघालेली मिनी बस ( Mini Bus ) खारघर उड्डाणपुलावरून ( Flyover of Kharghar Station ) खाली कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिनी बसचालक इरफान खान ( Mini Bus Driver Irfan Khan ) हा कळंबोलीवरून मीरा रोडकडे निघाला असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्याच्या बसला धडक दिली. धडक बसल्यानंतर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीचे स्टेअरिंग लाॅक ( Steering Lock ) झाल्याने डाव्या बाजूला सरकत सरकत खाली कोसळली.

Mumbai Accaident Case
मुंबई अपघात प्रकरण

नवी मुंबई :खारघर स्टेशनच्या ( Kharghar Station ) उड्डाण पुलावरून ( Flyover of Kharghar Station ) एक मिनी बस ( Mini Bus ) खाली कोसळून बसचालक जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कळंबोलीवरून ( Kalamboli ) मिनी बसचालक इरफान खान ( Mini Bus Driver Irfan Khan ) हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे चालला होता. खारघर स्टेशनच्या उड्डाणपुलावर त्याची बस असताना अचानकपणे एका भरधाव कंटेनरने त्याच्या बसला धडक दिली. धडक दिल्यानंतर कंटेनर चालक तसाच भरधाव निघून गेला. धडक बसल्याने बस पुलावरून खाली ( Bus Fell Down From Bridge ) कोसळली.

मुंबई अपघात प्रकरण

कंटेनर होता आऊट ऑफ कंट्रोल :मिनी बसचालक इरफान खान हा कळंबोलीवरून मीरा रोडला निघाला असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्याच्या बसला धडक दिली. कंटेनर हा आऊट ऑफ कंट्रोल होता. या कंटेनरने धडक देऊनसुद्धा तो तसाच पुढे निघून गेला. धडक बसल्याने बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला आली. त्यानंतर गाडी खाली कोसळली. सुदैवाने यात कोणी प्रवासी नव्हते.

स्टेअरिंग लाॅक झाल्याने गाडी कोसळली : गाडीला धडक बसल्यानंतर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीचे स्टेअरिंग लाॅक झाले. स्टेअरिंग लाॅक झाल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला सरकत सरकत पुलाच्या एका बाजूला सरकली. त्यानंतर बस खूपच डाव्या बाजूला येऊन उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यात बसचालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या गाडीत प्रवासीवर्ग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.


हेही वाचा :Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरातून ईडीने 11.50 लाख रुपये केले जप्त; छापेमारीदरम्यान सापडली रक्कम

ABOUT THE AUTHOR

...view details