महाराष्ट्र

maharashtra

Nashik Crime News: आईस्क्रीमने घेतला चिमुकलीचा जीव, नाशिकमध्ये फ्रीजरचा शॉक लागून मृत्यू

By

Published : Sep 2, 2022, 4:23 PM IST

Updated : Sep 3, 2022, 4:29 PM IST

सिडको भागातील त्रिमूर्ती चौक येथे एक धक्कादायक घटना ( Shocking incident ) घडली आहे. दुकानात आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला फ्रिजचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ( Death of a four year old child ) झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

electric shock
फ्रीजरचा शॉक लागून मृत्यू

नाशिक - सिडको भागातील त्रिमूर्ती चौक येथे एक धक्कादायक घटना ( Shocking incident ) घडली आहे. दुकानात आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला फ्रिजचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ( Death of a four-year-old child ) झाला ( Unfortunate Death Of Girl Child ) आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

फ्रीजरचा शॉक लागून मृत्यू



कुलकर्णी कुटुंबियांवर पसरली शोककळा - मिळालेल्या माहिती नुसार सिडकोमधील त्रिमूर्ती चौक भागात राहणारे विशाल कुलकर्णी हे आपल्या चार वर्षीय मुलगी ग्रीष्मासह घराजवळील एका दुकानात 1 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते, अशात ग्रीष्माला तेथील फ्रिजच्या वायरचा शॉक लागून ती खाली कोसळली, तिला तात्काळ वडील विशाल यांनी उचलून धावपळत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे विशाल कुलकर्णी यांना माेठा धक्का बसला आहे.अवघ्या चार वर्षीय ग्रीष्मा ही अचानक जग सोडून गेल्याने कुलकर्णी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तिच्या मृत्यूने नाशिक मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


काळजी घ्या -नाशिक मध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आहे तसेच अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा हा खंडित होत आहे. अशात नागरिकांनी पावसात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच विद्युत पोल किंवा रस्त्यावरील विद्युत उपकरणापासून लांब राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :Nagpur couple suicide धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या करणाऱ्यांची पटली ओळख, आत्महत्या करणाऱ्यांची धक्कादायक माहिती समोर

हेही वाचा :Minor Girl Rape Bhandup धक्कादायक ! भांडुपमध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन वर्षांपासून करत होते अत्याचार

Last Updated : Sep 3, 2022, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details