महाराष्ट्र

maharashtra

Gram Panchayat Election Results : सोलापुरात भाजपला जबर धक्का; चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला तर, मनगोळीमध्ये राष्ट्रवादी

By

Published : Aug 5, 2022, 3:45 PM IST

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मधील दोन ग्रामपंचायतीत भाजपला जबर धक्का ( BJP Solapur ) बसला आहे. चिंचपूर ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाने ( Uddhav Thackeray ) सात पैकी सातही जागांवर विजय ( Shiv Sena victory in Chinchpur Gram Panchayat ) प्राप्त केला ( Gram Panchayat Election Results ) आहे. मनगोळी ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्षानंतर भाजपाची एकहाथी असलेली सत्ता राष्ट्रवादीच्या ( NCP victory in Mangoli Gram Panchayat ) सुरेश हासापूरे गटाने ओढून घेतली आहे.

Etv BharatGram Panchayat Election Results
Etv Bharatग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल

सोलापूर-राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray ) शिवसेना, राष्ट्रवादी उभारी घेताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूरमधील दोन ग्रामपंचायतीत भाजपला जबर धक्का बसला आहे. चिंचपूर ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाने सात पैकी सातही जागांवर विजय ( Shiv Sena victory in Chinchpur Gram Panchayat ) प्राप्त केला आहे. मनगोळी ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्षानंतर भाजपाची एकहाती असलेली सत्ता राष्ट्रवादीच्या ( NCP victory in Mangoli Gram Panchayat ) सुरेश हासापूरे गटाने ओढून घेतली आहे. दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे माजी सहकार मंत्री, विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचा बोलबाला होता. चिंचपूर ग्रामपंचायतमध्ये माजी आमदार रविकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे. राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल ( Gram Panchayat Election Results ) आज लागत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल

चिंचपूर ग्रामपंचायतवर शिवसेनेचा विजय-महाराष्ट्र राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज्यातील निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागल होत. या निवडणुकीत सोलापुरात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला आहे. दक्षिण सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे. माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का बसला आहे. दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुखांचं मोठं वर्चस्व आहे. पण चिंचपूरमधला हा पराभव त्यांना मोठा धक्का देणारा आहे. आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.

हेही वाचा -congress agitation : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू

भाजपची एकहाती सत्ता गेली -दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाची एकहाती सत्ता होती. अमोगसिद्ध परिवर्तन विकास पॅनल गटाने ही सत्ता ओढून आपल्या ताब्यात आणली आहे. राष्ट्रवादीचे सुरेश हसापुरे यांच्या गटाने भाजपाची सत्ता पाडली आहे. मनगोळी ग्रामपंचायतमध्ये 6 जागापैकी 5 जागांवर राष्ट्रवादीने सत्ता प्राप्त केली आहे. एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. एका मताच्या फरकाने एक जागा गेली असल्याची माहिती विजयी उमेदवारांनी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यातील निवडणूका झाल्या -नाशिक जिल्ह्यातील 36, धुळे 41, जळगाव 20, अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकांसाठी सरासरी 78 टक्के एवढे मतदान झाले होते.

हेही वाचा -Rahul Gandhi on Government : काँग्रेसने 70 वर्षात कमावले ते भाजपने 8 वर्षात गमावले; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details