ETV Bharat / bharat

Rahul Gandhi on Government : काँग्रेसने 70 वर्षात कमावले ते भाजपने 8 वर्षात गमावले; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 5, 2022, 10:16 AM IST

Updated : Aug 5, 2022, 11:43 AM IST

काँग्रेसच्या राजवटीत देश विकासाच्या मार्गावर होता. मात्र मोदी सरकारने उलटा प्रवास केला आहे. काँग्रेस सरकारच्या 70 वर्षात देशाने जे काही कमावले ते भारतीय जनता पार्टी ( Bhartiya Janata Party ) सरकारच्या 8 वर्षांच्या काळात गमावले आहे, अशी टिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Congress Leader Rahul Gandhi ) यांनी आज केली. राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - काँग्रेसच्या राजवटीत देश विकासाच्या मार्गावर होता. मात्र मोदी सरकारने उलटा प्रवास केला आहे. काँग्रेस सरकारच्या 70 वर्षात देशाने जे काही कमावले ते भारतीय जनता पार्टी ( Bhartiya Janata Party ) सरकारच्या 8 वर्षांच्या काळात गमावले आहे, अशी टिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Congress Leader Rahul Gandhi ) यांनी आज केली. राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने देशभरात महागाई विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

चार-पाच लोकांच्या हितासाठी हे सरकार चालविले जात आहे

मोजक्या लोकांच्या हितासाठी - 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालविले जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांना केला. लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार उठवता कामा नये, हा या सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे. मोजक्या 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालवले जात आहे आणि ही हुकूमशाही 2-3 मोठ्या व्यावसायिकांच्या हितासाठी 2 लोक चालवत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी नाव घेता मोदी व शाह यांच्यावर केली आहे.

लोकशाहीचा मृत्यू - या देशात लोकशाहीचा मृत्यू होत असल्याचे आपण पाहत आहोत, अशी विखारी टिका राहुल गांधी यांनी केली. जवळपास शतकापूर्वीपासून सुरू झालेल्या भारताने जे कमाविले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. हुकूमशाही सुरू करण्याच्या या कल्पनेच्या विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

देशात हुकुमशाही सुरू - काँग्रेसने ७० वर्षांत देशासाठी जे काही कमविले आहे ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ८ वर्षात गमाविले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशात हुकुमशाही सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. दरम्यान, महागाई विरोधात काँग्रेसने आजपासून देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेने करण्यात आली.

हेही वाचा - Varsha Raut summoned by ED : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ६ ऑगस्टला हजर राहण्याचे ईडीचे समन्स

Last Updated : Aug 5, 2022, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.