महाराष्ट्र

maharashtra

Wrestler Shot Dead In Pune : चाकणमध्ये पैलवानाची गोळ्या झाडून हत्या

By

Published : Dec 24, 2021, 10:48 AM IST

Updated : Dec 24, 2021, 2:52 PM IST

पुण्याच्या चाकणमध्ये पैलवानाचा गोळ्या झाडून खून करण्यात (Wrestler Shot Dead In Pune) आला आहे. ही घटना चाकण येथील शेलपिंपळगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wrestler Shot Dead in Pune
Wrestler Shot Dead in Pune

पुणे -पुण्याच्या चाकणमध्ये पैलवानाचा गोळ्या झाडून खून करण्यात (Wrestler Shot Dead In Pune) आला आहे. ही घटना चाकण येथील शेलपिंपळगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेसावध असलेल्या नागेश उर्फ तात्या सुभाष कराळे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यात, त्यांचा मृत्यू झाला असून अधिक तपास चाकण पोलीस (Chakan Police Station) करत आहेत. याप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर याच्यासह इतर तीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैलवानाची गोळ्या झाडून हत्या


चाकण शेलपिंपळगाव येथे पैलवान नागेश यांचा गोळ्या झाडून खून (Wrestler Shot Dead In Pune) करण्यात आला आहे. नागेश मित्राला भेटून घरी जात होते. तेव्हा, मोटारीत बसताच नागेश यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. यात, त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. नागेश यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं चाकण पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये तीन खुनाच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हादरले आहे. त्यामुळं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं आहे.

सख्ख्या चुलत भावानेच केला भावाचा खून

पुण्याच्या तळेगावमध्ये ( Talegaon In Pune ) सख्ख्या चुलत भावानेच भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी ( Talegaon Dabhade Police ) ताब्यात घेतलं आहे. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली आहे. अणकुचीदार हातोडीने घाव घालून खून करण्यात आला ( Murder With Hammer In Pune ) आहे. शवविच्छेदन अहवालात हातोडीचा घाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्वी झालेल्या भांडणातून खून केला असल्याच पोलीस तपासात समोर आलं ( Police Cracked Murder Case ) आहे.

हेही वाचा -मोटरमनसह त्याच्या पत्नीच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; बनाव करणाऱ्या मुलानेच केली हत्या

Last Updated :Dec 24, 2021, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details