ETV Bharat / city

मोटरमनसह त्याच्या पत्नीच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; बनाव करणाऱ्या मुलानेच केली हत्या

author img

By

Published : Dec 23, 2021, 10:00 PM IST

कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. पित्याला लागलेले दारूचे व्यसन आणि आई मानसिक रुग्ण असल्याने वैतागलेल्या मुलाने पित्याची हत्या व आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्यानंतर या हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस काही काळ हबकले होते. लोकेश बनोरिया ( वय 27 ) असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे.

kalyan motorman murder by son
प्रमोद बनोरिया हत्या कल्याण

ठाणे - कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. पित्याला लागलेले दारूचे व्यसन आणि आई मानसिक रुग्ण असल्याने वैतागलेल्या मुलाने पित्याची हत्या व आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्यानंतर या हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस काही काळ हबकले होते. लोकेश बनोरिया ( वय 27 ) असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. आधी वडिलांनीच आपल्यासह आईवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केली, असा बनाव करणाऱ्या लोकेशला पोलिसांनी अटक केली आहे.

घटनास्थळाचे दृश्य

हेही वाचा - Meera Bhynder Crime : आमदार गीता जैन यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक

वडिलांची जागीच हत्या तर, आईचा उपचारादरम्यान मृत्यू

कल्याण पश्चिमेतील रामबाग परीसरातील निखिला हाईट्स या इमारतीत राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया यांच्यासह त्यांची पत्नी कुसूम आणि मुलगा लोकेश जखमी अवस्थेत आढळून आले होते. प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, कुसूम या गंभीर जखमी होत्या. वडिलांनी मला व आईला जखमी करून स्वत: आत्महत्या केली आहे, अशी माहिती लोकेशने प्राथमिक तपासात पोलिसांना दिली होती. मात्र, लोकेशच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास नव्हता. पोलिसांनी जखमी आई कुसूम आणि लोकेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी तपासचक्रांना वेग दिला. गंभीर जखमी असलेल्या लोकेशच्या आईने लोकेश खोटे बोलत असल्याचे सांगितले. गेल्याच शनिवारी कुसूम यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

मुलगा उपचाराअंती बरा झाल्यावर पोलिसांनी केली अटक

लोकेशची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान आपणच आई - वडिलांची हत्या केल्याची त्याने कबुली दिली. वडिलांना दारूचे व्यसन होते. ते दिवस - रात्र दारू पित असत, तर आई मानसिक रुग्ण होती. त्यामुळे, आपण वैतागलो आणि आलेल्या नैराश्यातून आपल्या हातून हे गंभीर कृत्य घडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारानंतर बरे होताच आज आईवडिलांच्या हत्येप्रकरणी अटक केली.

सोसायटीतील सुरक्षारक्षकामुळे घटना आली समोर

10 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोसायटीतील सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितले. मात्र, सुरक्षा रक्षकाला बनोरिया यांच्या घरी काहीतरी संशयास्पद वाटले, म्हणून त्याने सोसायटीतील इतर सदस्यांना याबाबत सांगितले. त्यानुसार सोसायटीतील रहिवाशांनी बनोरिया यांच्या घरी जाऊन पाहिले असता, घरात तिघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी बोलावल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकस तपास सुरू केला. या तपासादरम्यान बनोरिया दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचा - ठाणे जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन घेणार विद्यार्थ्यांची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.