महाराष्ट्र

maharashtra

लसीचा एक डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यापूर्वी तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवी - केंद्रीय मंत्री भरती पवार

By

Published : Oct 18, 2021, 8:39 PM IST

लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवीत. तज्ज्ञांकडून एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देण्याची शिफारस नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

expert opinion on corona vaccine Bharti Pawar
लसीचा एक डोस घेतलेल्यांना परवानगी

मुंबई -राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवाळी नंतर करोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस घेणाऱ्यांना निर्बंधानामध्ये शिथिलता देण्याचे सूतोवाच केले आहे. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवीत. तज्ज्ञांकडून एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देण्याची शिफारस नाही, अशी माहिती भारती पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री भारती पवार

हेही वाचा -राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे - बाळा नांदगावकर

दुसरी लाट अजून संपलेली नाही

भारती पवार पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र आणि केरळात अजुनही रुग्ण आहेत. सध्या सर्वकाही सुरू झाले असले तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही. काही देशांमध्ये तिसरी, चौथी लाट आल्याचे दिसले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबात गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबात नाही. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील.

दोन लसींमधील अंतर कमी करण्याबाबत अद्याप निर्णय नाही

लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवीत. तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी, अशा शिफारशी नाहीत. लसीच्या तुटवड्यावर हा पर्याय नाही. दोन लसींमधील अंतर कमी करण्याची राज्य सरकारने मागणी केली आहे, पण हा राजकीय विषय नाही. याबाबत 'सायंटीफिक बेस्ड स्टडीज' होऊन निर्णय होणे अपेक्षित आहे. अद्याप तरी त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.

पुणे महापलिकेने कोरोना काळात चांगले काम केले

मी पुणे खास महापालिकेच्या भेटीसाठी आले आहे. करोना काळात महापालिका पथकाने चांगले काम केले. त्यांनी कसे काम केले आहे, हे मला जाणून घ्यायचे होते. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईननुसार पालिकेने काम केले आहे. जवळपास तिप्पट ऑक्सिजन प्लांट तयार केले. हॉस्पिटलमध्ये बिल तक्रारी दूर करून साडेसहा कोटी रुपयांची बिले कमी करण्यात आली आहेत. मात्र, त्या दरम्यान 81 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देखील करण्यात आली, असेही भारती पवार यांनी नमूद केले.

हेही वाचा -भाजपचे १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात, डिसेंबरमध्ये धमाका करू - शिवसेना नेते यशवंत जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details