महाराष्ट्र

maharashtra

Angarki chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थी निमित्त 'दगडूशेठ' गणपतीला स्वराभिषेक, मंदिराला सुंदर फुलांची आरास

By

Published : Apr 19, 2022, 9:46 AM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतच्यावतीने आज अंगारकी चतुर्थीच्या ( Angarki Chaturthi Dagdusheth Ganpati pune ) निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक ( Dagdusheth Ganpati Swarabhishek pune ) आयोजित करण्यात आला.

Swarabhishek to Dagdusheth Ganpati pune
स्वराभिषेक दगडूशेठ गणपती पुणे

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतच्यावतीने आज अंगारकी चतुर्थीच्या ( Angarki Chaturthi Dagdusheth Ganpati pune ) निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक ( Dagdusheth Ganpati Swarabhishek pune ) आयोजित करण्यात आला.

माहिती देताना गायक निखिल महामुनी

हेही वाचा -सियाचीनमध्ये भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळांमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा होणार विराजमान

अंगारकी चतुर्थीच्या ( Angarki chaturthi 2022 ) निमित्ताने ब्रम्हणस्पती सुक्त अभिषेक, गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक, सकाळी ८ ते १२ आणि दुपारी २ ते ६ गणेश याग, असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रीचरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून तू माझा देवा, खुले देवघर, ओंकार तव, अन्नपूर्णा, कृष्ण सुदाम, अष्टविनायका अशी विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक ( Angarki Chaturthi pune ) अशी सजावट करण्यात आली आहे. फुलांची आरास व विद्युतरोषणाई देखील अंगारकी निमित्ताने साकारली आहे. पहाटे 4 पासूनच नागरिकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

हेही वाचा -Pune PMPML Anniversary : पुण्यात पीएमपीएलचा बस डे; वर्धापनानिमित्त 'या' सुविधांचा मिळणार लाभ

ABOUT THE AUTHOR

...view details