ETV Bharat / city

Pune PMPML Anniversary : पुण्यात पीएमपीएलचा बस डे; वर्धापनानिमित्त 'या' सुविधांचा मिळणार लाभ

author img

By

Published : Apr 18, 2022, 7:09 PM IST

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीएलचा आज ( 18 एप्रिल ) बस डे ( Pune PMPML Bus Day ) आहे. पुण्याची लाईफ लाईन असलेली पीएमपीएल ही खऱ्या अर्थाने पुणेकरांचा प्रवास सोपा आणि सुखकर ( Pune PMPML Annivesary ) करते.

PMPML
PMPML

पुणे - पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीएलचा आज ( 18 एप्रिल ) बस डे ( Pune PMPML Bus Day ) आहे. पुण्याची लाईफ लाईन असलेली पीएमपीएल ही खऱ्या अर्थाने पुणेकरांचा प्रवास सोपा आणि सुखकर करते. पुणेकरांचा प्रवास सोपा होण्यासाठी पीएमपीएलने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत.

तेजस्विनीच्या रूपाने महिलांसाठीचा प्रवास असू द्या किंवा एसी बस याने पुणेकरांनी अनेक वेळ प्रवास केला. त्यातच पुण्यात वाढती रहदारी लक्षात घेता पीएमपीएलने बीआरटी बस सेवा सुरू करून पुणेकरांचा प्रवास फास्ट व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्याच पीएमपीएलचा 19 एप्रिलला वर्धापनदिन ( Pune PMPML Annivesary ) आहे. दरवर्षी त्याच्या आदल्या दिवशी पीएमएलपीकडून बस डे साजरा करण्यात येतो.

वर्धापनदिनानिमित्त मिळणार 'या' सेवा - वर्धापनदिनानिमित्त सोमवार आणि मंगळवार पाच मार्गांवर लेनद्वारे बस सेवा पुरविण्यात येत आहे. त्यासाठी जवळपास 1800 बसेस वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरवल्या जात आहेत. महिलांना आज दिवसभर मोफत प्रवास मिळणार आहे. बस डेच्या निमित्ताने किमान तिकीट दर हा 5 रुपये असणार आहे. पीएमपीएमएल ( PMPML ) एक अनोखी सेवा यानिमित्ताने पुणेकरांना देत आहे.

‘या’ मार्गांवर धावणार विशेष सेवा -

  • जंगली महाराज रस्ता
  • फर्ग्यूसन कॉलेड रस्ता
  • कोथरूड डेपो ते डेक्कन
  • स्वारगेट ते शिवाजी नगर
  • शिवाजीनगर ते स्वारगेट (बाजीराव आणि शिवाजी रोड मार्ग)

हेही वाचा - Narayan Rane Adhish Bunglow : नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर कधीही पडू शकतो हातोडा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.