महाराष्ट्र

maharashtra

Caste Certification in Pune : जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा संताप

By

Published : Dec 7, 2021, 7:55 PM IST

Caste Certification in Pune

अभियांत्रिकी प्रवेशासाठी (Engineering Cap Round) पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आज मंगळवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप (Students agitation against the Caste certificate) व्यक्त केला.

पुणे - अभियांत्रिकी प्रवेशासाठी (Engineering Cap Round) पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आज मंगळवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, अर्ज करून शेवटच्या दिवशीही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या कार्यालयाकडून वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने प्रवेशाची संधी हुकणार आहे, अशी व्यथा मांडत विद्यार्थ्यांनी येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयासमोर संताप व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांचा संताप
काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावरअभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी पहिली प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानुसार सर्व प्रमाणपत्र सादर करीत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यात जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश होणार नाही, हे यापूर्वीच जाहीर करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. प्रमाणपत्र मिळत नसल्याने आता आयुष्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची संधी मिळणार नाही, असे सांगत काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा -Stay on Local Body Election : भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी जागांना स्थगिती

ABOUT THE AUTHOR

...view details