Stay on Local Body Election : भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी जागांना स्थगिती

author img

By

Published : Dec 7, 2021, 7:40 PM IST

जिल्हा परिषद भंडारा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) पत्र काढून भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत येथील ( Zilla Parishad in Bhandara District ) ओबीसीच्या सर्व जागेवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात ( Postponement of Elections For All OBC Seats ) आली आहे.

भंडारा - सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीत मागास प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर याचा पहिला परिणाम आज (मंगळवारी) भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाला. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) पत्र काढून भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत येथील ( Zilla Parishad in Bhandara District ) ओबीसीच्या सर्व जागेवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात ( Postponement of Elections for all OBC seats ) आली आहे. या निवडणुकीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गटातील सर्व निवडणुका या ठरलेल्या कालावधीनुसार होणार आहेत. या आदेशानंतर ओबीसीच्या सर्व उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • जिल्हा परिषदेच्या 13 जागेवर स्थगिती

भंडारा जिल्हा परिषद तथा पंचायत समिती आणि मोहाडी, लाखांदूर आणि लाखनी नगरपंचायतीच्या निवडणुका 21 डिसेंबरला होणार आहेत. 6 सहा डिसेंबर हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नामांकन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र सहा तारखेला सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बऱ्याच उमेदवारांना धक्का बसला आहे. 21 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी 52 जागांसाठी निवडणुका होणार होत्या. त्यापैकी अनुसूचित जाती पुरुष 4, अनुसूचित जाती महिला 6, अनुसूचित जमाती पुरुष 2, अनुसूचित जमाती महिला 1, सर्वसाधारण पुरुष 14, सर्वसाधारण महिला 12 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातून पुरुष 7 आणि महिलाच्या 6 जागांसाठी मतदान होणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सात पुरुष आणि सहा महिला अशा 13 जिल्हा परिषदेच्या जागेवर स्थगिती आदेशाचे पत्र राज्य निवडणूक आयोगान जारी आहे.

  • पंचायत समितीच्या 124 जागांवर स्थगिती

भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर आणि साकोली या सातही पंचायत समितीमध्ये 124 जागांसाठी निवडणूक होणार होती. या 124 पैकी 16 महिला आणि 9 पुरुषांच्या जागा या ओबीसीसाठी राखीव होत्या. या जागेवर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे, तसे पत्र आज निवडणूक आयोगातर्फे प्राप्त झाला आहे.

  • नगरपंचायतीच्या 12 जागेवर स्थगिती

मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तिन्ही नगरपंचायतीमध्ये प्रत्येकी चार अशा एकूण 12 जागांवर सुद्धा स्थगिती आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने पत्र काढून या जागांना स्थगिती दिली आहे. तर उर्वरित सर्व जागांवर ठरलेल्या दिवशी निवडणूक होणार आहे. निवडणुकीला स्थगिती आल्यानंतर ओबीसीच्या सर्व उमेदवारांमध्ये चिंतेचे आणि नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. सहा तारखेला मोठ्या उत्साहात या सर्व उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र निवडणूक होण्यापूर्वीच अनपेक्षितपणे आलेला हा निकाल उमेदवारांच्या काळजाचे ठोके वाढविणारा आहे. पुढील काळात या निवडणुका होतील का? पुन्हा संधी मिळेल का? अशा विविध प्रश्नांचा भडीमार सध्या या उमेदवारांच्या डोक्यात सुरू आहे.

हेही वाचा - Stay on Local Body Election : ओबीसी प्रवर्गातील चारशे जागांवरील निवडणुकांना स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.