महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar in Pune : काही लोक जात, धर्माच्या माध्यमातून द्वेष निर्माण करतात - शरद पवार

By

Published : May 12, 2022, 10:13 AM IST

प्रत्येक धर्म हा कोणाचा द्वेष करायला सांगत नाही. धर्म...बंधुभाव, विकास सांगतो. आज देशामध्ये वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत, असेही शरद पवार यांनी सांगितले. ते ते पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा, ईद-ए-मिलन कार्यक्रमात बोलत होते.

Saharad Pawar
Saharad Pawar

पिंपरी-चिंचवड : काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला द्वेष नको, आम्हाला भांडण तंटा नको, आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला महागाईमधून सुटका पाहिजे, तरुणांना रोजगार कसा मिळेल ही स्थिती निर्माण करायची आहे. देश, राज्य प्रगत कस होईल ही स्थिती निर्माण करायची आहे. ते करायचं असेल तर धार्मिक, भाषिक, यांची एकता अत्यन्त गरजेची आहे अस प्रतिपादन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar in Pune) केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा, ईद-ए-मिलन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सर्वधर्मीय धर्मगुरू उपस्थित आहेत. तसेच, शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, खासदार अमोल कोल्हे, प्रथम आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

काश्मीर फाईल्स काय आहे?
प्रत्येक धर्म हा कोणाचा द्वेष करायला सांगत नाही. धर्म...बंधुभाव, विकास सांगतो. आज देशामध्ये वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. पुढे ते म्हणाले की, काय आहे काश्मीर फाईल्स? काय प्रकार आहे? काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. शेजारील देशाला तो मान्य नाही. तो देश अतिरेकी संघटना शक्ती देऊन काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लिमांवर हल्ले करण्याच काम करतो.

निंदनीय कृत्य

'जे हल्ले झाले. ते दुर्दैवाने तिथल्या लोकांना वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. या काश्मीर फाईल्स च्या माध्यमातून काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लिम यांच्यावर जे हल्ले झाले. त्या काळामध्ये देशात, केंद्र सरकारमध्ये भाजपचे राज्य होत. तोच विचार आज काश्मीरच्या नावाने लोकांमध्ये एक प्रकारच संघर्षाच वातावरण झालं पाहिजे याची काळजी घेतली जात आहे. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे.

हेही वाचा -Damage Mango Crop In MP: उष्णतेचा तडाखा! कडाक्याच्या उन्हाने आंबा पिकाचे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details