महाराष्ट्र

maharashtra

Devendra Fadnavis : संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना कामं नाहीत, आम्हाला कामं आहेत : देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 17, 2022, 5:53 PM IST

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) यांच्यावर बोचरी टीका केली ( Devendra Fadnavis Criticized Sanjay Raut ) आहे. संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहेत. त्यांना कामं नाहीत, आम्हाला कामं आहेत, असं म्हणत फडणवीस यांनी राऊत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना बगल दिली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पुणे : संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती असून, ते रोज दिवसभर काहीतरी बोलत असतात. कारण त्यांना काही कामं नाहीत. मात्र आम्हाला कामं आहेत. ते मोकळे आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) यांना लगावला ( Devendra Fadnavis Criticized Sanjay Raut ) आहे.


२०२४ कोल्हापूरची ती जागा आम्हीच जिंकू :काल उत्तर कोल्हापूर मतदार संघाचा निकाल ( Kolhapur North By Election Result 2022 ) लागला आहे. यात भाजपचा पराभव झाला असून, त्यावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. आम्ही आम्हाला मिळलेल्या मतावर समाधानी असून, आम्ही एकटे लढलो. ते तिघे लढले तरी आम्हाला तेवढी मत मिळाली. 2024 ला आम्ही ही जागा नक्की जिंकू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना कामं नाहीत, आम्हाला कामं आहेत : देवेंद्र फडणवीस


अयोध्येचा दौरा कुणी केला तरी हरकत नाही :अयोध्याला राज ठाकरे यांनी जाणं यात गैर ( Fadnavis On Raj Thackeray Ayodhya Visit ) नाही. कोणीही प्रभू रामचंद्रांच दर्शन घ्यायला जाऊ शकत. कारण प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहेत, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर व्यक्त केलं आहे. आजच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला आपण अयोध्येत जाणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांच्या या दौऱ्याला एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबाच दिला आहे.

हेही वाचा : संजय राऊत रोज सकाळी आमचे मनोरंजन करतात - फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details