ETV Bharat / bharat

Devendra Fadnavis Critics on Sanjay Raut : संजय राऊत रोज सकाळी आमचे मनोरंजन करतात - फडणवीस

author img

By

Published : Feb 9, 2022, 3:45 PM IST

संजय राऊत यांच्या वक्तव्याने आमची करमणूक होते व ते रोज सकाळी उठून आमची करमणूक करतात, ते रोज सकाळी उठून आमचे मनोरंजन करतात, अशी मिश्कील टीका देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली (Devendra Fadnavis Critics on Sanjay Raut) आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. पणजी येथे भाजप उमेदवार रोहन खवटे यांच्या जाहीरनामा प्रशासन सोहळा आज (दि. 9 फेब्रुवारी) सकाळी फणवीस यांच्या हस्ते पार पडला.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पणजी (गोवा) - संजय राऊत यांच्या वक्तव्याने आमची करमणूक होते व ते रोज सकाळी उठून आमची करमणूक करतात, ते रोज सकाळी उठून आमचे मनोरंजन करतात, अशी मिश्कील टीका देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली ( Devendra Fadnavis Critics on Sanjay Raut ) आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. पणजी येथे भाजप उमेदवार रोहन खवटे यांच्या जाहीरनामा प्रशासन सोहळा आज (दि. 9 फेब्रुवारी) सकाळी फणवीस यांच्या हस्ते पार पडला.

बोलताना देवेंद्र फडणवीस

संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सभापतींना लिहिले पत्र - संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे, जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे. विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

त्यांना माहित आहे दिवसभर चर्चेत कसे रहायचे - संजय राऊत एका दैनिकाचे संपादक आहेत. त्यामुळे नेमकी कोणती हेडलाईन दिवसभर चालेल हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते दिवसभर चर्चेत राहण्याच्या हिशोबानेच एखादी हेडलाइन मीडियासाठी देतात आणि चर्चेत राहतात.

हेही वाचा - Goa Assembly Election :..म्हणून अमित शहांविरोधात तृणमूल काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.