महाराष्ट्र

maharashtra

किरण गोसावीची महिला साथीदार कुसुम गायकवाड हिला 3 दिवसांची पोलीस कोठडी

By

Published : Nov 13, 2021, 8:09 PM IST

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेला किरण गोसावी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये दाखल गुन्ह्याबाबत किरण गोसावीला अटक करण्यात आली होती.

Kusum gaikwad
Kusum gaikwad

पुणे : तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. फसवणूक प्रकरणातील गोसावीची आणखी एक महिला साथीदार कुसुम गायकवाड हिला लष्कर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आज तिला कोर्टात हजर केले असता तिला 15 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. तिच्याकडून साडे सहा लाख रुपये लष्कर पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर झाली अटक -
शिवराज जमादार या तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवत एक लाख तीस हजार रुपये उकळल्याप्रकरणी किरण गोसावी आणि कुसुम गायकवाड यांच्यावर पुण्यातील लष्कर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी कुसुम गायकवाड हिला शुक्रवारी अटक झाली होती. कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी अटक केली.

गोसावीच्या एका महिला सहकाऱ्याला अटक
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकाऱ्याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती.

गोसावीच्या अडचणीत वाढ -
आर्यन खान प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेला किरण गोसावी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये दाखल गुन्ह्याबाबत किरण गोसावीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर किरण गोसावीकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार आणखीन चार तरुणांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे आणि वानवडी पोलीस ठाण्यात दिली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये देखील गोसावी याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -Amravati Violence : विघ्नसंतोषी लोकांपासून तरुणांनी सावध रहा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन


आर्यन खान ड्रग्ज केसनंतर गोसावी चर्चेत
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये किरण गोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांचे पथक किरण गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊला गेले होते. अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश आर. के. बाफना भळगट यांनी सुरुवातीला 8 दिवसांची नंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोठडीत 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला लष्कर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कोण आहे किरण गोसावी ?
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली होती. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली. त्यामुळे गोसावी वादात अडकला. त्यातच त्याच्याविरोधातील काही फसवणुकीचे प्रकरणेही समोर आली आहेत.

काय आहे प्रकरण ?
किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्याच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्या तरुणाला मलेशियाला पाठवले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला होता. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फरासखाना पोलीस त्याचा शोध घेत होते.
हेही वाचा -कंगनाच्या मेंदूला गंज आलाय, तिला मनोरुग्णालयात भरती करा; वादग्रस्त वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details