ETV Bharat / state

Amravati Violence : विघ्नसंतोषी लोकांपासून तरुणांनी सावध रहा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

author img

By

Published : Nov 13, 2021, 5:20 PM IST

Updated : Nov 13, 2021, 5:48 PM IST

काही विघ्नसंतोषी लोकांकडून तरुणांना चिथावले जात आहे. त्यांना भडकवण्याचे काम काहीजण करत आहेत. मात्र, जनतेने विशेष करून तरुणांनी अशा दिशाभूल करणाऱ्या समाज कंटकांपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते अहमदनगर येथे बोलत होते.

Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनर - त्रिपुरा कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ काल निघालेल्या मोर्चात झालेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून आज अमरावतीमध्ये भाजपने बंद पुकारला. या बंददरम्यान पुन्हा हिंसाचार झाला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांनी शांत राहून संयम पाळण्याचे आवाहन केले. (Ajit Pawar on Amravati Violence) ते जामखेडमध्ये बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण याबाबत बोलताना

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

काही विघ्नसंतोषी लोकांकडून तरुणांना चिथावले जात आहे. त्यांना भडकवण्याचे काम काहीजण करत आहेत. मात्र, जनतेने विशेष करून तरुणांनी अशा दिशाभूल करणाऱ्या समाज कंटकांपासून सावध राहिले पाहिजे. हे राज्य सर्व समाजाला सोबत ठेवून स्वराज्य चालवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. जाती-पाती-धर्माचे राजकारण न करता एकोप्याने सर्वांनी वागावे. हिंसाचारात गरिबांचे नुकसान होते त्याचा विचार करून वागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar appealed citizens over Amravati Violence)

दोषींवर कारवाई केली जाईल - अशोक चव्हाण

त्रिपुरा कथित हिंसाचारावर बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देशाच्या इतर राज्यात होणाऱ्या घटनांचे पडसाद इथे पडणे दुर्दैवी आहे. लोकांनी शांतता बाळगावी. काही लोक सामाजिक तणाव निर्माण करण्याचे काम करत आहे. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. नगर जिल्ह्यातील जामखेड इथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, शुभारंभ कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Ashok Chavan on Amravati Violence)

कर्जत-जामखेड विकासकामांचा शुभारंभ -

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज जामखेड आणि कर्जत इथे दोन कार्यक्रमात झाला. यावेळी जामखेड तालुक्यातील मंजूर झालेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तसेच आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे आदींच्या उपस्थितीत पार पडला.

हेही वाचा - Amravati violence शहरात शांतता ठेवा, घटनेला कोणीही राजकीय वळण देऊ नये -पालकमंत्री यशोमती ठाकूर

आता गपगुमान बसा, राम शिंदेंना टोला

यावेळी बोलताना अजित पवार यांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय विविध मुद्यांना हात घालत टोलेबाजी केली. जनतेने आता रोहितला निवडून दिले आहे. त्यामुळे आता तुम्ही शांत बसा. तुम्हाला जनतेने का नाकारले याचे आत्मचिंतन करा, या शब्दात त्यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना टोला लगावला. रोहित चांगले काम करत आहे. तर त्यांचे कौतुक करा, आम्ही नाही का चांगले काम करणाऱ्या गडकरींचे तोंडभरून कौतुक करतो, तसे आता रोहितच्या कामाचे कौतुक करा आणि गमगुमान बसा, असाही टोला लगावला.

एफआरपी वरून कारखानदारांना सुनावले -

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्याने 2800 रुपये असा सर्वाधिक भाव दिला आहे. इतर अनेक कारखाने अजून एफआरपी देत नाही आहेत. काहींनी तर दोन वर्षांपासून एफआरपी थकवले आहेत, असे चालणार नाही. कारखान्यांनी चांगला एकरकमी एफआरपी तातडीने दिला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

एसटी प्रश्नांत शरद पवारांनी लक्ष घातलंय -

एसटीचे कर्मचारी आपलेच बांधव आहेत. जनताही आपलीच आहे. त्यामुळे यातून मार्ग निघाला पाहिजे. या प्रश्नात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लक्ष घातले आहे. या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा लवकरच निघेल, असेही ते म्हणाले.

Last Updated :Nov 13, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.