महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar On Ukraine Russia War : संयुक्त राष्ट्रात भारत तटस्थ राहिल्याने विद्यार्थ्यांना त्रास - शरद पवार

By

Published : Mar 5, 2022, 3:36 PM IST

युक्रेन आणि रशियात युद्ध सुरु आहे. मात्र, भारताने संयुक्त राष्ट्रात तटस्थ भूमिका घेतल्याने युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, ( India Neutral Role In United Nation ) असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले ( Sharad Pawar On Ukraine Russia War ) आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे - युक्रेन-रशियाच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर जी भूमिका घेतली आहे, त्यावर टिका टिप्पणी करण्याची गरज नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रात तटस्थ राहिल्याने युक्रेनचे लोक भारतावर नाराज ( India Neutral Role In United Nation ) आहे. त्यामुळे तेथील भारतीय मुलांना त्रास होत आहे, असे पवार यांनी ( Sharad Pawar On Ukraine Russia War ) म्हटलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, विद्यार्थी म्हणतात की, त्यांना 2 गोष्टींचा त्रास होत आहे. एक तर रशियांच्या गोळीबाराचा आणि दुसरी अडचण संयुक्त राष्ट्रात भारत तटस्थ राहिला. त्यामुळे युक्रेनचे लोक भारतावर नाराज असल्याने मुलांना त्रास होत आहे. विदेशात कमी मार्क आणि कमी किंमतीत प्रवेश मिळतो. जसे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, तसे युक्रेन हे शैक्षणिक हब आहे. म्हणून विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात.

युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना 6 ते 7 किलोमीटर चालावे लागत आहे. संकाटाच्यावेळी कोणी काय केले, काय नाही केले. यापेक्षा सर्वांना एकत्र येत मुलांना कसे सुरक्षित परत आणता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहे, त्यांनी यावर अधिक लक्ष द्यावे, असेही पवार यांनी म्हटलं.

माझी इतकी वाईट.....

येत्या 10 दहा तारखेला 5 राज्यांचा निकालबाबात विचारले असता पवार म्हणाले की, माझी अवस्था अजूनही इतकी वाईट झाली नाही की, मी ज्योतिषाचे काम करेल. मी काही ज्योतिषाचे काम घेतलेले नाही.

शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना

राणेंना एक न्याय, दुसरीकडे मलिकांना....

नबाव मलिक यांना राजीनामा मागत आहे. मात्र, त्यांचेच केंद्रातील मंत्री नारायण राणे यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. पण, त्यांना मंत्रीमंडाळातून का काढले नाही. राणेंना एक न्याय देता, दुसरीकडे मलिकांचा राजीनामा मागता, याचा अर्थ हा राजकीय खेळ आहे, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा -Russia declares ceasefire in Ukraine : हल्ले थांबणार, रशियाकडून युक्रेनच्या दोन शहरांमध्ये तात्पुरता युद्धविराम

ABOUT THE AUTHOR

...view details