महाराष्ट्र

maharashtra

Congress Women Wing Agitation Pune : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विरोधात महिला काँग्रेसकडून आंदोलन

By

Published : May 16, 2022, 5:33 PM IST

Updated : May 16, 2022, 5:44 PM IST

स्मृती इराणींना ( Union Minister Smriti Irani ) देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी चूल व बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ( Pune police arrested Congress workers ) ताब्यात घेतले आहे.

Congress Women Wing Agitation
Congress Women Wing Agitation

पुणे - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आज (सोमवारी) पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दरम्यान पुण्यातील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या ( City Women Congress Committee ) रोषाला समोरे जावे लागले. इराणींना ( Union Minister Smriti Irani ) देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी चूल व बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ( Pune police arrested Congress workers ) ताब्यात घेतले आहे.

आंदोलन करताना महिला काँग्रेस कार्यकर्त्या

केंद्र सरकारविरोधात घोषणा :आंदोलक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात 'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नांवर पोलिसांनी अशाप्रकारे शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत, असे मत पुणे शहर महिला काँग्रेसच्या शराध्यक्षा पूजा आनंद यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -Ketki Chitale House Investigation : केतकी चितळेच्या घरी गुन्हे शाखेकडून तपास; अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Last Updated : May 16, 2022, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details