महाराष्ट्र

maharashtra

Bridge in Chandni Chowk : स्फोटकाने चांदणी चौकातील पूल पडलाच नाही.. पोकलेनसह जेसीबीची घ्यावी लागली मदत!

By

Published : Oct 2, 2022, 6:27 AM IST

Updated : Oct 2, 2022, 1:23 PM IST

अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग अगदी आहे त्या स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त केला ( bridge in Chandni chowk demolished ) जाणार असे संबधित कंपनी आणि प्रशासनामार्फत सांगितले होते. मात्र पूल पडलाच नाही.

जेसीबी पोकलेन
जेसीबी पोकलेन

पुणे- दिल्ली येथील ट्वीन टॉवर ( Noidas Supertech Twin Towers ) ही इमारत 12 सेकंदात ईडीफाईस कंपनीने ( team of Edifice Engineering ) पाडली होती. ती इमारत पडतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच कंपनी मार्फत पुण्यातील चांदणी चौकातील पुल रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 600 किलो स्फोटाने ( Around 600 kg of explosive) आणि पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने अडीच वाजल्याच्या सुमारास पाडण्यात आला आहे. स्फोटकाने पुलाचा मध्यभाग पडला असल्याने एनएचएआय आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल नियोजनामध्ये अपयश आल्याचे यातून स्पष्ट होत आहे.



स्फोटात पुलाचा अर्धाच भाग पडला-गेल्या 15 दिवसांपासून चांदणी चौक येथील पूल पाडण्याबाबत नियोजन केले जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून हे पूल पाडण्यासाठी पुलामध्ये 1350 छिद्र करून 600 किलो स्फोटक वापरण्यात आले होते. हा पूल 6 सेकंदात जमीनदोस्त होईल असे सांगण्यात आले होते. मात्र 1 वाजता स्फोट झाला. अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग अगदी आहे त्या स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त केला जाणार असे संबधित कंपनी आणि प्रशासनामार्फत सांगितले होते. मात्र पूल पडलाच नाही. त्यानंतर पोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पडण्यात आला आहे. अखेर अडीच वाजता हा पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे.

पोकलेनसह जेसीबीची घ्यावी लागली मदत


काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होतेचांदणी चौकातील पुल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत. आम्ही जो ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला. आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. हा जो ब्लास्ट करण्यात आला आहे त्याला फ्रागमेंटेशन अस म्हणतात. ट्वीन टॉवर पाडण्यासाठी जी पद्धत वापरण्यात आली होती त्याला इम्पपुलसिव ब्लास्टिंग म्हटले जाते, असे यावेळी एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष महेता यांनी माहिती दिली. तसेच सकाळी ८ च्या आधीच आमचे काम पूर्ण होईल. हा मार्ग देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्फोटकाने चांदणी चौकातील पूल उद्धवस्त



आम्हला पुलामधील स्टीलचा अंदाज नाही आलाज्यावेळी हा पूल बांधण्यात आला.त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही.त्यामुळे काहीसा भाग राहीला होता. मात्र आम्ही सांगितलेल्या वेळेनुसार पूल पडला जाईल आणि वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांनी म्हटले होते.



अशी घेण्यात आली होती खबरदारीचांदणी चौकातील ( vehicular traffic on Mumbai Bengaluru Highway ) पूल रविवारी मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास पूल पाडणार असल्याने, त्यापूर्वीच प्रशासनाने सायंकाळी 6 वाजल्यापासून पूल परिसरातील 200 मीटरचा परिसरात निर्मनुष्य करण्यास सुरुवात केली होती .तर कलम 144 लागू करण्यात आला होते. तसेच त्यानंतर रात्री 11 नंतर वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूने भल्या मोठ्या पांढर्‍या पडद्याने संपूर्ण भाग झाकला गेला. जेणेकरून पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये. याबाबत विशेष काळजी घेण्यात आली. मध्यरात्री 1 वाजता स्फोट झाला आणि अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग अगदी आहे. त्या स्थितीत होते.त्यामुळे पोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पाडण्यात आला.



मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीपूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यात 16 एक्सेव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर यांचा समावेश होता. पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.



पोलीस अधिकारी-कर्मचारीही तैनातसुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Last Updated :Oct 2, 2022, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details