महाराष्ट्र

maharashtra

गोव्यात काँग्रेसचा भाजपाविरोधात मशाल मोर्चा पेटला

By

Published : Oct 21, 2021, 7:27 AM IST

सत्ताधारी भाजपाविरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेसने बुधवारी रात्री मशाल मोर्चाचे आयोजन केले होते, मात्र आंदोलकांना समजावूनही हजारोंच्या संख्येचा मोर्चा माघारी न निघाल्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला.

mashal morcha in Panji against BJP government
गोव्यात काँग्रेसचा भाजपाविरोधात मशाल मोर्चा पेटला

पणजी - राज्यात मागच्या ५ वर्षात सत्ताधारी भाजपा जनतेला न्याय देण्यास असमर्थ ठरले आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपाच्या हातात असणारे गोवा वाचविण्यासाठी सेव्ह गोवाचा नारा देत बुधवारी काँग्रेसने मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात हजारो काँग्रेस कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.

गोव्यात काँग्रेसचे भाजपाविरोधात आंदोलन
परिस्थिती नियंत्रणाबाहेर आणि पोलिसांचा लाठीचार्ज -

सेव्ह गोवा, कॅसिनो पासून गोवा मुक्त करा, राज्यातील जनतेला न्याय द्या, अशा विविध मागण्यांचे पोस्टर घेऊन काँग्रेसने आझाद मैदान ते पणजी शहर असा मशाल मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात जळत्या मशाली घेऊन काँग्रेस कार्यकर्ते भाजपविरोधी घोषणाबाजी करत होते. मात्र या मोर्चामुळे राजधानी पणजी शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्ते व नेत्याना मोर्चा माघारी नेण्याची विनंती केली. मात्र, त्याला कार्यकर्ते व नेत्यानी दाद न देता मोर्चा पुढेच चालू ठेवला अखेर समजावून ही काँग्रेस ने मोर्चा माघारी न नेल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे अचानक झालेल्या लाठीचार्ज मुळे आंदोलक काँग्रेस कार्यकर्ते वाट मिळेल त्या दिशेने पळू लागले. या एकंदर परिस्थितीमुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

लाठीचार्ज वर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह?


शांतपणे निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी कोणाच्या इशाऱ्यावर लाठीचार्ज केला, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. दरम्यान गृहखात्याचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या इशाऱ्यावर पोलीस कारवाई करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा -माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांचे कुठे हनीमुन चालले आहेत? - अमृता फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details