ETV Bharat / city

माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांचे कुठे हनीमुन चालले आहेत? - अमृता फडणवीस

author img

By

Published : Oct 20, 2021, 10:13 PM IST

Updated : Oct 20, 2021, 10:43 PM IST

शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून वारंवार मोदी सरकार व भाजप नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाल्या, की सामनाकडे फक्त तेच काम आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार आहे. लुटारुंवर टीका करणे सामनाला शक्य नाही.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

मुंबई - माजी गृहमंत्री आणि माजी पोलीस आयुक्त कुठे हनिमुनला चालले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगाविला आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बेपत्ता असल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यावरून अमृता फडणवीस यांनी ही टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की सर्वांचे हिंदुत्व सारखेच असते. परंतु त्याला विविध रंग देण्याचे काम हे राजकारणी करत असतात. त्यामुळे अशा राजकारण्यांपासून सावध राहायला हवे, असेही त्यांनी सांगितले आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोनाला प्रतिबंध करणारी जगातील सर्वात मोठी मोहीम हाती घेण्याचा निश्चय २०२० साली केला. २०२१ साली त्याची पूर्तता होत आहे. म्हणूनच भारतातील १०० कोटी जनतेला लस देण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन व आभार प्रकट करण्यासाठी मुंबईतील माधवबाग येथे १०० दीप प्रज्वलित करण्यात आले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

हेही वाचा-दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून महाआघाडी अन् भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप !



काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार-
शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून वारंवार मोदी सरकार व भाजप नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाल्या, की सामनाकडे फक्त तेच काम आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार आहे. लुटारुंवर टीका करणे सामनाला शक्य नाही. त्यामुळे भाजपवर टीका करणे हेच त्यांचे एकमेव काम असल्याचे सांगत अमृता फडणीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा-शिवसेनेची वाटचाल काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांच्या दिशेने - देवेंद्र फडणवीस

वादग्रस्त विधानांनी आणि ट्विटने चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस यांनी बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. येणाऱ्या दिवसात याचे पडसाद नक्कीच उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारांनी अमित शाह यांची घेतली भेट

नवं हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला नव हिंदू पासून धोका असल्याचे सांगितल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा हात घातला आहे. राज ठाकरे यांच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Last Updated : Oct 20, 2021, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.