महाराष्ट्र

maharashtra

मुंबईतील भुजबळांचे घर कोणाचे हे मुख्यमंत्री व शरद पवारांनी सांगावे, किरीट सोमैय्यांचे आव्हान

By

Published : Sep 1, 2021, 3:16 PM IST

Updated : Sep 1, 2021, 3:29 PM IST

सोमैय्या यांनी बुधवारी वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बांधलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरासाठी भुजबळ यांनी पैसा कुठून आणला. मुंबईतदेखील भुजबळ यांच्या भुजबळ महालची पाहणी करायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किरीट सोमैय्या
किरीट सोमैय्या

नाशिक - आर्म स्ट्रॉंग कंपनीत छगन भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ हे मुंबईतील नऊ मजली घरात राहतात. तो कुणाचा आहे ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला. भुजबळांचे घर कुणाचे आहे, हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी शोधून दाखवा असे आवाहनही सोमैय्या यांनी दिले.

भाजप नेते किरीट सोमैय्या हे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमैय्या म्हणाले की, भुजबळ यांनी आपल्या संपत्तीचे मालक कोण आहेत, हे स्पष्ट करून माहिती द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना चुकीचे काम केल्याबद्दल मंत्रिमंडळातून बाहेर काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

किरीट सोमैय्यांची पत्रकार परिषद

हेही वाचा-Marital Rape : पत्नीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार नाही का? कायदा काय सांगतो...

भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचे सौमय्या यांनी केले गंभीर आरोप

सोमैय्या यांनी बुधवारी वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बांधलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरासाठी भुजबळ यांनी पैसा कुठून आणला. मुंबईतदेखील भुजबळ यांच्या भुजबळ महालची पाहणी करायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किरीट सोमैय्या यांनी आर्म स्टाँग कंपनीला दिली भेट

पुढे सोमैय्या म्हणाले, की मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहीर करावी. त्यांची १२० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. या कंपन्यांमधील पैसा कुठून आला? आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भुजबळ यांच्याशी निगडीत अनेक बोगस कंपन्या आहेत. भुजबळांची पनवेल, नाशिक, अंधेरी व सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

यापुढे लिस्टमधील 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड असल्याचे सूचक वक्तव्य सोमैय्या यांनी केले आहे.

हेही वाचा-महाविकास आघाडीतील नाराज नेते रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटतात - चंद्रकांत पाटील



भुजबळ परिवाराच्या या ४ कंपन्यांमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार

भुजबळ परिवाराच्या ४ कंपन्यांमध्ये काही आर्थिक व्यवहार व व्यवसाय नाही. परंतु या कंपन्यांचे १०० रुपयांचे शेअर हे रुपये १०,००० च्या भावाने कोलकता येथील शेल कंपन्यांनी विकत घेतले. मेसर्स परवेश , मेसर्स देविशा , मेसर्स आर्मस्ट्रॉग या कंपन्यांचे स्टेट्स नसताना १०,००० रुपये त्यांचा शेअर म्हणजेच मनी लॉड्रींग असल्याचा दावा सोमैय्या यांनी केला. सुरेश जजोडिया ,सीएस सरडा , संजीव जैन आणि प्रवीण कुमार जैन या एजंटने शेल कंपन्यांद्वारा भुजबळ परिवाराला ११० कोटी रुपये व्हाईट करून दिले. या मनी लॉड्रींगबद्दल ईडीने २०१५ मध्ये भुजबळ परिवाराव कारवाई करून अटक केली होती. प्राप्तीकर विभागाने सुमारे ११० कोटी रुपयांची छगन भुजबळ परिवाराची बेनामी संपत्ती जप्त केली. मुंबई येथील सत्र न्यायालयामध्ये बेनामी संपत्ती कायद्या अंतर्गत दावा करत गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते किरीट सौमय्या यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात छगन भुजबळ यांची बेनामी मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा-Breaking: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

भावना गवळी यांच्यावरही केला आरोप

भाजपाचे नेते सोमैय्या यांनी भाजप कार्यालयात भेट दिल्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भावना गवळी यांची 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान' ही एक संस्था आहे. त्या संस्थेचे रूपांतर हे त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये केले आहे. तसेच महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची सर्व कागदपत्र ही बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Last Updated :Sep 1, 2021, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details