ETV Bharat / city

महाविकास आघाडीतील नाराज नेते रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटतात - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Sep 1, 2021, 2:57 PM IST

Updated : Sep 1, 2021, 8:56 PM IST

महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोडण्याचे काम आमचे नसून महाविकास आघाडीमधीलच नाराज नेते स्वतःहून रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटायला येत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला आहे. चंद्रकांत पाटील सध्या तीन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

अमरावती - केंद्र सरकारच्या माध्यमातून तपास यंत्रणा मागे लावून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला होता. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या या आरोपाला प्रत्त्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोडण्याचे काम आमचे नसून महाविकास आघाडीमधीलच नाराज नेते स्वतःहून रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटायला येत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला आहे. चंद्रकांत पाटील सध्या तीन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

चंद्रकांत पाटील

'ईडीची यादी माझ्याकडे नाही'

राजकारणात फोडाफोडी होत असते. आम्ही फोडायचे काम करत नाहीत. परंतु महाविकास आघाडीमधील नाराज लोकांना आधी सांभाळा, असा सल्लाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ईडीची यादी माझ्याकडे नसून सर्वसामान्य लोकांकडून असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यात मंदिरेही उघडावी लागतील. अण्णा हजारे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जर मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही बळजबरीने उघडू, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.

'वरुडमधून दौऱ्याला सुरुवात'

चंद्रकांत पाटील हे आजपासून तीन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जवळपास पाच तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या ते भेटी घेणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आज वरुडमधून या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांच्या भेटी, पक्षाची मोटबांधणी तसेच अनेक पदाधिकाऱ्यांचे प्रवेशसुद्धा पक्षात करून घेतले जाणार आहेत. सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील

'पाठीत खंजीर खुपसणारा कोण?'

वरुड येथे डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, की पाठीत खंजीर खुपसणारा म्हणून एकच नाव होते आधी. आता दुसराच चेहरा दिसतो. मोदींवर टीका करण्यावरूनही त्यांनी समाचार घेतला.

Last Updated : Sep 1, 2021, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.