महाराष्ट्र

maharashtra

नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे कडक निर्बंध लागण्याचे संकेत

By

Published : Sep 6, 2021, 9:38 PM IST

जिल्ह्यात मागील पाच दिवसांची कोरोना बाधितांची आकडेवारी दोन अंकी झाली आहे. सणा सुदीच्या काळात लोकांची गर्दी आणि तिसऱ्या लाटेच्या वाटेवर वेळीच निर्बंध लावणे आवश्यक असल्याचे म्हणत येत्या दोन ते तीन दिवसात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

third wave measures Nitin Raut
कोरोना निर्बंध माहिती नितीन राऊत

नागपूर - जिल्ह्यात मागील पाच दिवसांची कोरोना बाधितांची आकडेवारी दोन अंकी झाली आहे. सणा सुदीच्या काळात लोकांची गर्दी आणि तिसऱ्या लाटेच्या वाटेवर वेळीच निर्बंध लावणे आवश्यक असल्याचे म्हणत येत्या दोन ते तीन दिवसात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. ते विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

माहिती देताना पालकमंत्री नितीन राऊत

हेही वाचा -ईडा पीडा घेऊन जा गे मारबत... कोरोनाचा सावटाखाली बडग्या-मारबत उत्सवाला सुरुवात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पदार्पण झाल्याचे सूतोवाचही पालकमंत्री राऊत यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी विमला आर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्‍त अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधिर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठक घेत आढावा घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्याच्या अनुषंगाने सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, तसेच उद्योजक या सगळ्यांशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत घेतला जाईल, असेही पालकमंत्री राऊत यावेळी म्हणाले. यात 78 कोरोना बधितांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पाठवले आहे, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

यावेळी बैठकीत मागील काही दिवसांत जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या संदर्भात आढावा घेत तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करण्यात आली. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेताना, उपाययोजना संदर्भात आढावा घेत असताना मेडिकलमध्ये 201 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती उपस्थिती अधिकाऱ्यांनी दिली.

तिसऱ्या लाटेत आयसीएमआरने सांगितलेल्या तरतुदीच्या तपासणीचे काम प्रशासनाने केले आहे. सर्व रुग्णालयात लहान मुलांसाठी बेड उपलब्ध करण्याचे सांगितले आहे. आज 12 रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

कोरोना परिस्थिती

सप्टेंबर महिन्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

1 सप्टेंबर - 6 रुग्ण
2 सप्टेंबर - 6 रुग्ण
3 सप्टेंबर - 1 रुग्ण
4 सप्टेंबर - 7 रुग्ण
5 सप्टेंबर - 10 रुग्ण
6 सप्टेंबर - 12 रुग्ण

कोणते निर्बंध लावण्याचे संकेत

1) सध्या हॉटेल व्यवसायाला 10 वाजेपर्यंत परवानगी असून निर्बंध लावत वेळ 8 पर्यंत करण्याचे संकेत.

2) बाजारपेठेतील दुकानांची वेळ 10 वरून निर्बंध लावत 4 पर्यंत करण्याचे संकेत.

3) विकेंड (शनिवार - रविवार) दोन दिवस सर्व बंदचे संकेत.

हेही वाचा -जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा हा राष्ट्रवादी विचारांचा - संघ विचारक सुधीर पाठक

ABOUT THE AUTHOR

...view details