ETV Bharat / state

ईडा पीडा घेऊन जा गे मारबत... कोरोनाचा सावटाखाली बडग्या-मारबत उत्सवाला सुरुवात

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बडग्या-मारबत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पिवळी मारबत उत्सव गेल्या 137 वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो तर काळ्या मारबतीलाही 141 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 6, 2021, 5:42 PM IST

Updated : Sep 6, 2021, 7:17 PM IST

नागपूर - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बडग्या-मारबत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पिवळी मारबत उत्सव गेल्या 137 वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो तर काळ्या मारबतीलाही 141 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झाल्या असून त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली आहे. इंग्रजी शासन आणि भोसले राजवटीला विरोध करण्यासाठी नागपुरकर दरवर्षी मारबत हा उत्सव साजरे करतात. भारतात अशा प्रकारे मिरवणूक काढून विरोध करण्याची परंपरा अनोखी आहे. आता समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी मारबत काढली जाते.

आढावा घेताना प्रतिनिधी

बैल-पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणुकी शहरातून काढली जाते. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे तयार केली जातात. देशात एकमात्र नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मारबत मिरवणूक काढली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे महत्त्व

धावपळीच्या या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडत असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुराने 137 आणि 141 वर्षे जुन्या ऐतिहासिक परंपरेचे जतन केले आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रुढी-परंपरा, अंधश्रद्धेच दहन करणे आणि चांगल्या परंपरा, विचारांचे स्वागत करणे. महाभारताचा संदर्भही या उत्सवाला दिला जातो. कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्रतीक काळी मारबत आणि लोकांचे रक्षण करणारी पिवळी मारबत, अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.

लोकांना एकत्र करण्याचा मुख्य हेतू

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी नागपूर येथे मारबत उत्सव सुरू करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षाही जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रुढी, परंपरा होत्या. ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याचे प्रतीक म्हणजे पिवळी मारबत. वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हावे. चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी ही मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या 137 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते.

हेही वाचा - नागपूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कन्हान नदीत 5 तरुण बुडाले

Last Updated : Sep 6, 2021, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.