महाराष्ट्र

maharashtra

नागपूर : एटीएम कार्ड क्लोनकरुन बँकेची लाखो रुपयांनी फसवणूक

By

Published : Sep 4, 2021, 6:47 AM IST

एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम मशीनमधून तब्बल दीड लाख रुपये काढून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

nagpur
nagpur

नागपूर -ऑनलाईन बँक फसवणुकीच्या घटनांसोबतच आता एटीएम कार्डचे क्लोन करून लाखो रुपये बँक खात्यातून काढले जात असल्याचा घटना वाढल्या आहेत. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीसांनी अश्याच एका प्रकरणाचा उलगडा केला आहे. ज्यामध्ये आरोपींनी एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम मशीनमधून तब्बल दीड लाख रुपये काढून बँकेची फसवणूक केली आहे. या संदर्भात वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फसवणूक करण्याची नवीन शक्कल -

नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सीए मार्गावर वर्धमान अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएम मशीनमधून दोन चोरट्यांनी १७ ते १८ ऑगस्ट दरम्यान एक लाख 50 हजार रुपये वेगवेगळ्या एटीएम कार्डचा उपयोग करून काढले आहेत. एटीएम मशीनमधून पैसे कमी झाल्यानंतरदेखील कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसल्याची माहिती बँक स्टेटमेंटमध्ये दाखवते आहे. त्यामुळे बँकेची फसवणूक करण्याची नवीन शक्कल चोरट्यांनी शोधून काढली आहे. चोरट्यांनी बँकेची फसवणूक करण्यासाठी एसबीआयचे एटीएम वापरून तब्बल एक लाख 50 हजार रुपये काढलेले आहेत. या संदर्भात माहिती समजताच बँकेच्या व्यवस्थापकांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चोरट्यांचा एटीएममधून पैसे काढतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मात्र, यात चोरट्यांनी तोंडावर मास्क लावले असल्याने त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पोलीस तपासात अडचण येऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेड सार्वजनिक करण्यात आलेले नाही.

हेही वाचा - Money Laundering Case : संजीव पालांडे यांची मुंबई हायकोर्टात धाव!

ABOUT THE AUTHOR

...view details