महाराष्ट्र

maharashtra

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, "मर्सडीज बेबीला संघर्ष..."

By

Published : May 4, 2022, 3:30 PM IST

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबीला संघर्ष करावा लागला नाही, असे टोला देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लगावला ( Devendra Fadnavis Taunt Aaditya Thackeray ) आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1857 च्या उठावात सामील होते, असा टोला मंत्री आदित्य ठाकरेंनी लगावला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबीला संघर्ष करावा लागला नाही, त्यांनी कधी संघर्ष पहिला नाही. पण, त्यांनी जी कारसेवकाची थट्टा उडवली, त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. ते उडवू शकतात. त्यांनी कितीही थट्टा उडवली, तरी त्यावेळी आम्ही बाबरी मस्जिद पाडण्याच्या तिथे होतो. मी हिंदू आहे, त्यामुळे हिंदू धर्मानुसार मी जन्म आणि पुनर्जन्म दोन्ही मानतो. तुम्ही अश्या लोकांशी युती केली ते 1857 युद्धाला स्वतंत्र युद्ध मानत नाही, त्यामुळे त्यांना काय बोलायाचे आहे ते बोलू द्या, असा टोला देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंना लगावला ( Devendra Fadnavis Taunt Aaditya Thackeray ) आहे.

ते नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा करंटेपणा राज्य सरकारने केला. त्यामुळे कधीही, असे प्रकरण न्यायालयात टिकू शकत नाही. राणा दाम्पत्यला जामीन मिळणार ( Devendra Fadnavis On Rana Couple ) होताच.

देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना

मनसेच्या आंदोलनाबाबत बोलताना फडणवीसांनी सांगितले की, राज्य सरकार राणा दाम्पत्यावर चालीसा म्हणल्यामुळे राजद्रोह लावते. तर, भोंग्या स्वरूपात त्यांची भूमिका सर्वांना माहीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती काही कोण्या एका पक्षाची नाही. सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर राजकीय पक्षांना आपली भूमिका मांडावी ( Devendra Fadnavis On Loudspeaker Controversy ) लागेल.

'ओबीसींचे मोठे नुकसान' -सर्वोच न्यायालयाचे म्हणणे अजून पूर्णतः स्पष्ट झाले नाही. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवू शकत नाही. त्यामुळे अशा सगळ्या ठिकाणी निवडणुका घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहे. त्यामुळे दोन वर्षे पूर्ण करून राज्य सरकारने केवळ वेळकाढूपणा केला. ट्रिपल टेस्ट पूर्ण करू शकले नाही. त्यामुळेच अशा पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने योग्य करवाई केली नाही. सर्वोच न्यायालयाचे निर्णयाचे संपूर्ण वाचून समजून पुढील भूमिका ठरवण्यात येईल. ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होणार असून, याला सरकारच जबाबदार आहे, अशा आरोपही फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला ( Devendra Fadnavis On OBC Reservation ) आहे.

'उद्धव ठाकरे आणि अमृत फडणवीस यांच्यात साम्य' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी बायको अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही आणि माझी बायको नको त्या गोष्टींना उत्तर देणे सोडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची गरिमा ठेवली पाहिजे. माझ्या पत्नीला सुद्धा नको त्या गोष्टींना उत्तर देण्याची गरज नाही. त्यामुळे यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले ( Devendra Fadnavis On Uddhav Thackeray ) आहे.

हेही वाचा -Repo Rate Hike in May : आरबीआयकडून रेपो दरात वाढ, बँकांच्या कर्जाचे व्याजदर वाढणार

ABOUT THE AUTHOR

...view details