ETV Bharat / business

Repo Rate Hike in May : आरबीआयकडून रेपो दरात वाढ, बँकांच्या कर्जाचे व्याजदर वाढणार

author img

By

Published : May 4, 2022, 2:52 PM IST

आरबीआयचा रेपो दर वाढविण्यास पतधोरण समितीमधील ( RBI Monetary Policy Committee ) सदस्यांनी एकमत दिले आहे. त्यामुळे नवीन रेपो दर 4.4 टक्के असणार ( RBI Governor on Repo rate ) आहे. आरबीआयकडून रेपो दर वाढविले जाणार असल्याचा अंदाज करण्यात येत होता. त्याप्रमाणे यावेळी आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे.

Repo Rate Hike in May
आरबीआय रेपो दर

मुंबई- तुम्ही जर कर्ज घेणार असाल किंवा बँकांचे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला व्याजदर जास्त द्यावा लागणार आहे. कारण, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 40 बीपीएसने वाढ केल्याचे ( RBI hikes benchmark interest rate ) जाहीर केले. ते त्रैमासिक पतधोरणाच्या बैठकीनंतर माध्यमांशी ( latest RBI repo rate ) बोलत होते.

आरबीआयचा रेपो दर वाढविण्यास पतधोरण समितीमधील ( RBI Monetary Policy Committee ) सदस्यांनी एकमत दिले आहे. त्यामुळे नवीन रेपो दर 4.4 टक्के असणार ( RBI Governor on Repo rate ) आहे. आरबीआयकडून रेपो दर वाढविले जाणार असल्याचा अंदाज करण्यात येत होता. त्याप्रमाणे यावेळी आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. यापूर्वी आरबीआयने सलग 11 वेळ रेपो दर स्थिर ठेवला होता. रेपो दर स्थिर राहिल्याने कर्जाचे दर स्थिर राहिले होते. मात्र, आता रेपो दर वाढल्याने बँकांचे व्याजदर वाढणार आहेत.

आरबीआयने चलनवाढीचा अंदाज वर्तवित चालू आर्थिक वर्षाचा (२०२२-२३) जीडीपी वृद्धीदर पूर्वीच्या तुलनेत कमी होईल, असा अंदाज केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर सांगितले, की चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आर्थिक विकासात सातत्य राखण्यासाठी मध्यवर्ती बँक आपली लवचिक भूमिका बदलत आहे.

रेपो रेट म्हणजे काय?- देशातील प्रमुख बँक असणारी रिझर्व्ह बँक इतर बँकांना अल्पमुदतीचा वित्तपुरवठा करताना जो व्याजदर आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. बँका याच पैशांमधून ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्याने बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणारी कर्ज कमी व्याजदरावर उपलब्ध होतात. याचा थेट फायदा गृहकर्ज, वाहनकर्जाबरोबरच इतर खासगी कर्ज घेणाऱ्यांना होतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते तेव्हा कर्ज स्वस्त होते. उलट रेपो दर वाढला की कर्ज महाग होते. आरबीआयकडून दर दोन महिन्यांनी रेपो दरांचा आढावा घेण्यात येतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटच्या उलट असतो. बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर त्यांना व्याज मिळते त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. बँकाकडे जो अतिरिक्त पैसा असतो ते रिझर्व्ह बँकेकडे जमा केले जातो. यावर बँकांनाही व्याज मिळते. बाजारामध्ये मोठ्याप्रमाणात चलन उपलब्ध असल्याने रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते. रिव्हर्स रेपो रेट वाढवल्याने बँका जास्त व्याज कमवण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करतील अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेला असते.

हेही वाचा-RBI Monetary Policy : बँकांच्या दृष्टीने व्यावहारिक धोरण, ऑगस्टमध्ये रेपो दर वाढण्याची शक्यता

हेही वाचा-Job in RBI : वैद्यकीय सल्लागाराच्या रिक्त जागांवर थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

हेही वाचा-कोरोनाचा फटका! भारतीय अर्थव्यवस्थेचे सुमारे 52 लाख कोटींचे नुकसान; वाचा 'RBI'चा अहवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.