महाराष्ट्र

maharashtra

Sushma Andhare joins Shiv Sena : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश; उपनेतेपदी नियुक्ती

By

Published : Jul 28, 2022, 3:33 PM IST

Updated : Jul 28, 2022, 5:16 PM IST

आंबेडकर चळवळीतीस प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी शिनसेनेत ( Sushma Andhare joins Shiv Sena ) प्रवेश केला आहे.

Sushma Andhare
सुषमा अंधारे

मुंबई -आंबेडकर चळवळीतीस प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी शिनसेनेत ( Sushma Andhare joins Shinsena ) प्रवेश केला आहे. याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) म्हणाले की, सुषमाताईसह त्यांचे सैनिक युद्ध सुरू असताना शिवसेनेत आलेत. मुद्दाम उल्लेख करतो, नीलमताई या देखील कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या, तरी देखील त्या शिवसेनेत आल्या. पण आता बघा कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी? याचा विचार तुम्ही करा असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, आम्ही 3 तास बोलत होतो, विविध विषयांवर बोललो, मला भूक लागली म्हणून मी म्हणालो नंतर भेटू, त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला की मला शिवसेनामध्ये यायचे आहे.

ज्यांना शिवसेनेने सामान्यांचे असामान्य केले ते निघून गेले. मात्र, पुन्हा सामान्य सैनिकांना असामान्य करण्याची वेळ आली आहे अशी टीका त्यांनी शिंदे गटावर नाव न घेता केली. पुढे ठाकरे म्हणाले की, ठीक आहे, अशा गोष्टी होत असतात. दिवसवर खाली होत असतात, पण एका गोष्टीचे कौतुक वाटते की, सुषमाताई आज शिवसेनेत आल्या. शिवसेनेच्या दोन लढाया सुरू आहेत. एक सुप्रीम कोर्टात आहे, त्याबद्दल मला बोलायचे नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी नव्याने बांधणी करावी लागणार असल्याचे म्हणटले आहे.

कोण आहेत सुषमा अंधारे - सुषमा अंधारे यांचा जन्म कळंब तालुक्यातील पाडोळी जिल्हा उस्मानाबाद येथे झाला आहे. सुषमा अंधारे यांच्या वडिलाचे नाव दत्ताराव गूत्ते असे आहे. त्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमा यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांमध्ये वाद होवू लागले होते. तेव्हा आजोबांनी सुषमाला आपल्याकडे ठेवून घेतले. त्यांनी सुषमाची सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव सुषमा दगडू अंधारे असे, नाव कागदोपत्री नोंदले गेले.

बौद्धधर्माची दीक्षा -सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. महात्मा फुले-शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. अंधारे यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी भदंत नागार्जुन सुरई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह ’उपरा’कार लक्ष्मण माने, एकनाथ आवाड यांच्यासह बौद्धधर्माची दीक्षा घेतली आहे.

हेही वाचा -Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी

व्यावसायिक कारकीर्द -सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र, २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.

भारतभर फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रचार - परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या. सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशील आहेत. भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.

अंधारे यांचा राजकीय प्रवास - इ.स. २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्या पराभूत झाल्या होत्या.

हेही वाचा -Governor Bhagat Singh Koshyari : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

Last Updated :Jul 28, 2022, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details