ETV Bharat / city

Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी

author img

By

Published : Jul 28, 2022, 1:00 PM IST

Updated : Jul 28, 2022, 2:07 PM IST

Threat Swapna Patkar : संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकरला ( Swapna Patker ) यांना धमकी मिळाली आहे. पत्राद्वारे बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी ( Rape and death threats ) स्वप्ना पाटकरला यांना अज्ञात व्यक्तीकडून लेखी पत्राद्वारे धमकी मिळाली आहे.

Threat Swapna Patkar
Threat Swapna Patkar

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पत्रा चाळ जमीन घोटाळ्या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची ईडी कडून जबाब नोंदवण्यात आला आहे या जबाब संजय राऊत यांचा विरोधातील असल्याने हा जबाब मागे घेण्यात यावा तसेच तुम्हाला किरीट सोमिया यांनी असे बोलण्यास सांगितले असल्याचे जबाब ईडीला द्या अन्यथा तुमच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती न पाटकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे दिली आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील साक्ष मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत या मागचे खरे सूत्रधार असल्याचे देखील पाटकर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी वाकोला पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.

पत्र
पत्र

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी स्वप्ना पाटकर यांनी ईडी समोर जबाब नोंदवला आहे. पण स्वप्ना पाटकर यांनी ईडी आणि मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी आपल्याला दोन-तीन फोन नंबरवरुन बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्यावा किंवा बदलावा यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

Threat Swapna Patkar

ईडीनं त्यांच्या पत्राची दखल घेतली असून त्यांची ही तक्रार वाकोला पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनाही याची एक प्रत पाठवण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस याची चौकशी करत आहेत. दरम्यान संजय राऊत यांना कथीत 1,034 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात ईडीनं गुरुवार.चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पण राऊत या चौकशीला हजर राहिले नव्हते. यापूर्वी दोन वेळा संजय राऊत यांची या प्रकरणी ईडीनं चौकशी केली आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा? - मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

संजय राऊतचे नाव समोर - ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.

हेही वाचा - शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात, महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार - संजय राऊत

Last Updated :Jul 28, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.