महाराष्ट्र

maharashtra

Shiv Sena Dasara Melava : पारंपारिक आणि ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी

By

Published : Sep 30, 2022, 3:09 PM IST

एक नेता, एक झेंडा, एक मैदान पारंपरिक, ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! अशा शब्दात शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी टिझर (Shiv Sena Dasara Melava Teaser Launch) प्रदर्शित केला आहे. (Uddhav Thackerays appeal to Shiv Sainik)

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई :दसरा मेळाव्याची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा टिझर रिलीज झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याचा टिझर लाँच केला (Shiv Sena Dasara Melava Teaser Launch) आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान, पारंपारिक आणि ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन यातून शिवसैनिकांना करण्यात आले (Uddhav Thackerays appeal to Shiv Sainik) आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकवणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार असा संदेश या टीझर मधून दिला जातो आहे.


दसरा मेळाव्याला गर्दी खेचण्याचा प्रयत्न -शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार ? यावरून सुरू असलेल्या वादावर न्यायालयाने पडदा टाकल्यानंतर दसरा मेळाव्याला गर्दी खेचण्याचा प्रयत्न जोरदार सुरू झाला आहे. शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची वातावरण निर्मिती करण्यासाठी पहिला टिझर लाँच करण्यात आला आहे. अंगावर रोमांच उभी करणारी बाळासाहेब ठाकरे यांचे 'माझ्या तमाम हिंदू मराठी बंधू आणि भगिनींनो' ही टॅग लाईन टिझरमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच एक नेता, एक झेंडा, एक मैदान, पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले (Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray ) आहे.

दसरा मेळावा शिवसेना



एकनाथ शिंदे यांचा टिझर -शिंदे गटाकडून पहिला टीझर रिलीज केला असून यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील आवाजाचा वापर करण्यात आला आहे. शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,' या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून देण्यात आली आहे. गर्व से कहो हम हिंदू है, एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य आणि एक नाथ असा नारा दिला आहे. शिवसेनेची निशाणी असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करणाऱ्या शिंदेंनी बॅनरवर रेखाटलेले धनुष्यबाण चिन्ह लक्ष्य वेधून घेत (Shiv Sena Dasara Melava) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details