ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कलानगरच्या गच्चीवर बोलल्याप्रमाणे - निलेश राणे

author img

By

Published : Oct 21, 2021, 9:10 AM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा विजयादशमीच्या मुहूर्तावर पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावरून माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. कलानगरच्या गच्चीवर बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्री बोलते होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फक्त खंजीर, गांजा, हेच होतं. बाळासाहेबांच्या दसऱ्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं, पण हे महाराष्ट्र लुटतायत, असे निलेश राणे म्हणाले.

Nilesh Narayan Rane
निलेश राणे

रत्नागिरी - दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण हे कलानगरच्या गच्चीवर केलेलं भाषण होतं. त्या भाषणाला हात पाय नव्हते, मुख्यमंत्री कसे बोलले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फक्त खंजीर, गांजा, कुणाचे मायबाप काढणे हेच होते, अशी टीका भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केली. भाषण हे दसऱ्या मेळाव्याचे की बीजेपी विरोधातले होते, असा सवाल निलेश राणेंनी केला. बाळासाहेबांच्या दसऱ्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं, पण हे महाराष्ट्र लुटतायत यांच्यामध्ये दुसरे विचार देखील नसतील. त्यामुळे कुठल्या गल्लीमध्ये बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्री बोलले, अशी टिका माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

निलेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका


महाराष्ट्र यांच्या बापाचा आहे का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र कारखाना लुटण्यासाठी दिला का. पवार आणि आजूबाजूचे जेलमध्ये गेले पाहिजेत. हे महाराष्ट्रात फिरायच्या लायकीचे नाहीत असेही निलेश राणे म्हणाले. चोरी चकारी केली, तर यंत्रणा मागे लागणारच, यंत्रणा मागे लागयला प्रोसिजर असते. लफडी करायची नव्हती मग, परवा ज्या रेड झाल्या. ती काय गरीबाच्या घरी झाल्या का, असा थेट सवाल माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवार यांना केला आहे. या रेडमध्ये अजित पवार यांच्या पार्टनर, शेल कंपन्या, परदेशी ठेवलेले पैसे, अकाऊंट असेच विषय आले असणार, अजित पवार यांना देशाचा पैसा लुटायला काय लायसन्स दिलंय का, हे तुरुंगात गेले पाहिजे, असे निलेश राणे म्हणाले.

अजित पवार यांच्यावर टीका -

जरंडेश्वर कारखाना म्हणा किंवा 45 कारखाने यांनी गिळलेत. राज्य सहकारी बॅकेला हाताशी धरून हे काम केलंय. महाराष्ट्र यांच्या बापाचा आहे का. पवार यांना महाराष्ट्र कारखाना लुटण्यासाठी दिला का, असा थेट सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला. राज्य सहाकारी बॅक लुटायच्या, महाराष्ट्र लुटायचा आणि दाखवायचं आम्ही पवार असे करतो, आम्ही तसे करतो. दम नाही कुणात आणि हे महाराष्ट्र लुटायला निघालेत. साताऱ्याची सभा पावसात घेतली. सोशल मिडियावर राष्ट्रवादीवाले मिरवतायत पण सांगली कोल्हापूरला पाऊस पडला तुटपुंजी मदत दिली गेली. फक्त 10 हजारांची मदत दिली गेली. पवार आणि आजूबाजूचे जेलमध्ये गेले पाहिजेत. हे महाराष्ट्रात फिरायच्या लायकीचे नाहीत, असा घणाघात निलेश राणेंनी पवार कुटुंबावर केला.

शिवसेना सोडणाऱ्यांच्या 15 जणांच्या यादीत रामदास कदम पहिले नाव -


आम्ही शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. शिवसेना सोडणाऱ्या 15 जणांच्या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते. आमच्या तेव्हाच्या शासकीय बंगल्यावरून रामदास कदम बाहेर पडले. खेडमध्ये परिस्थिती बघून येतो, कार्यकर्त्यांशी बोलून येतो. मग बाॅम्ब टाकूया, असे म्हणाले होते. ते महाड जवळ आले तेव्हा त्यांना बंगल्यावरून फोन आला विरोधी पक्ष नेते पद देतो. त्यांनी त्यावेळी गाडी वळवली आणि मातोश्रीला गेले. हेच रामदास कदम नेहमी पक्षाच्या विरोधात काम करत आलेत. या रामदास कदम यांच्याकडून तुम्ही पक्ष निष्ठा, या आपेक्षा उद्धव ठाकरे किंवा समान्य शिवसैनिकांनी ठेवू नयेत. ते तोंडावर खोटं बोलतील आणि तुम्हाला कळणार नाही, असा देखील हल्लाबोल माजी खासदार निलेश राणेंनी रामदास कदमांवर चढवला.

रामदास कदम खोटारडे -


सरळ सरळ त्या आँडिओ क्लिपमध्ये रामदास कदम यांचा आवाजच आहे. रामदास कदम एवढे खोटारडे आहेत की ते कुणाच्याही शपथा घेत खोटं बोलू शकतात. विरोधी पक्ष नेता होते, त्यावेळी सेटलमेंटची काम व्हायची म्हणुन रामदास कदम विरोधी पक्ष नेता होते, हे महाराष्ट्र विसरले. विरोधी पक्ष नेते असताना सहा वर्षात त्यांनी राणेंना शिव्या घालण्याचे काम केले. 70 आोलांडलेल्या कदमांनी खरं बोललं पाहिजे. आता तरी जुन्या सवयी सोडल्या पाहिजेत. अनिल परबांच्या विरोधात कोण आहे. हा मतदार संघ त्यांच्या मुलाचा आहे. कर्वे रामदास कदम यांच्या किती जवळ आहे, हे मला वेगळं सांगायची गरज नाही. रामदास कदम सर्व खोटं बोलतायत त्यांनी ही सवय सोडून द्यावी, असा टोला देखील निलेश राणेंनी रामदास कदमांना लगावला.


हेही वाचा - BIG BREAKING : तुमच्या डोक्यात ज्याक्षणी हवा जाईल त्याक्षणी तुम्ही संपलात - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.