महाराष्ट्र

maharashtra

Samruddhi Mahamarga : नव्या वर्षात नागपूर ते शिर्डीपर्यंतचा समृध्दी महामार्ग खुला होणार - एकनाथ शिंदे

By

Published : Dec 9, 2021, 9:08 PM IST

नागपूर ते शिर्डीपर्यंतचे (Nagpur To Shirdi Samruddhi Mahamarga) ५०० किलोमीटरचे अंतर नव्या वर्षात नागरिकांसाठी खुला करण्याचा राज्य सरकारच्या प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका खासगी कार्यक्रमात दिली.

Eknath Shinde
Eknath Shinde

मुंबई -राज्याचा महत्वकांक्षी असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Hinduhrudaysamrat Balasaheb Thackrey Samruddhi Mahamarga) काम युद्ध पातळीवर सुरु असून आतपर्यंत ८५ टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर ते शिर्डीपर्यंतचा (Nagpur To Shirdi Samruddhi Mahamarga) ५०० किलोमीटरचे अंतर नव्या वर्षात नागरिकांसाठी खुला करण्याचा राज्य सरकारच्या प्रयत्न आहे. याशिवाय समृद्धी महामार्ग केवळ नागपूरपर्यंत न ठेवता गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका खासगी कार्यक्रमात दिली आहे.

नक्षलग्रस्त जिल्हात विकासाची गंगा वाहावी- शिंदे

देशातील सर्वाधिक मोठा आणि राज्याचा महत्त्वाकांक्षी सुपरफास्ट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे काम मंदावले होते. मात्र, आता या कामाला वेग आला असून आतपर्यंत ८० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जागा अधिग्रहणाची समस्या संपली आहे. शिर्डीपर्यंत ५०० किलोमोटर लांबीचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. या महत्त्वकांशी प्रकल्पाबाबद राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वपूर्ण माहिती एका खासगी कार्यक्रमात दिली. समृद्धी महामहामार्गातील शिर्डी ते नागपूरपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यात नागरिकांसाठी हा महामार्ग खुला करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर समृद्धी महामार्ग केवळ नागपूर पुरता मर्यादित न ठेवता नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्हापर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचावा आणि या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाची गंगा पोहचावी, यासाठी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत.

नागपूर ते मुंबई अवघ्या सात तासात-

समृद्धी महामार्गाचे काम ८५ टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जागा अधिग्रहणाची समस्या संपली आहे. शिर्डीपर्यंत ५०० किलोमोटर लांबीचे काम जवळपास पूर्णत्त्वास आले आहे. यापूर्वी नागपूर ते मुंबई अंतर कापण्यास १२ ते १४ तासांचा अवधी लागत होता. मात्र, आता या मार्गावरून नागपूर ते मुंबई अवघ्या सात तासात गाठता येणार आहे.

प्रकल्पाची सध्याची परिस्थिती -

मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे का अंतिम टप्प्यात आले आहे. शिर्डीपर्यंतचा ५०० किलोमीटरचे अंतर काम अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित २०१ किलोमीटरचे अंतर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम ३० नोव्हेंबर २०१५ पासून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे आले होते. तेव्हापासून या मार्गाचं काम वेगात सुरू आहे. विक्रमी वेळेत जमीन अधीग्रहण यासह विविध कामे करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुद्धा अपेक्षित वेळे पूर्वीच करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. या मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होण्याची तारीख २०२० देण्यात आली आहे.

हेही वाचा- Sanjay Raut Tweet On Yogi Adityanath : आणि संजय राऊतांनी ट्वीट केला योगी आदित्यनाथ यांचा 'तो' व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details