ETV Bharat / city

Sanjay Raut Tweet On Yogi Adityanath : आणि संजय राऊतांनी ट्वीट केला योगी आदित्यनाथ यांचा 'तो' व्हिडीओ

author img

By

Published : Dec 9, 2021, 3:40 PM IST

Updated : Dec 9, 2021, 4:11 PM IST

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांना दिल्लीच्या कार्यक्रमादरम्यान खुर्ची बसण्यासाठी दिली. संजय राऊत यांच्या कृत्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ (Sanjay Raut Tweet On YogiAdityanath) यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Shivsena MP Sanjay Raut tweet
Shivsena MP Sanjay Raut tweet

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांना दिल्लीच्या कार्यक्रमादरम्यान खुर्ची बसण्यासाठी दिली होती. यावरून भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी संजय राऊत डिवचण्याचा (BJP Leader Critisize Sanjay Raut) प्रयत्न केला. यांसंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याबाबत आक्षेपाहार्य शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर अशा आक्षेपार्ह शब्दाचा वापर केवळ आपणच नाही. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील केला आहे, असे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. तोच आक्षेपाहार्य शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वापरत असल्याचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे.

  • दुनिया में चुतियोंकी कमी नही
    एक धूंडो तो हजार मिलेंगे...
    जरा योगिजी को सूनीये.. pic.twitter.com/jd1R9bFAI8

    — Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप नेते आक्रमक -

संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झाले आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केले.

राऊतांनी ट्वीट केला आव्हाडांचा व्हिडीओ -

दरम्यान, संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Avhad) यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये आव्हाड यांनी मोठ्या माणसांचा आदर करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा - Defence Minister on Helicopter Crash in LS : अवघ्या २० मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला; सिंहानी लोकसभेत सांगितला घटनाक्रम

Last Updated : Dec 9, 2021, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.