महाराष्ट्र

maharashtra

अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली, तब्बल 2 तास चालली चौकशी

By

Published : Oct 21, 2021, 12:50 PM IST

Updated : Oct 21, 2021, 7:59 PM IST

आज अभिनेत्री अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. तब्बल अडीच तासा चौकशी करण्यात आली. अनन्या दोन तास उशिरा आल्यामुळे आज पूर्ण चौकशी करता आली नाही. त्यामुळे, अनन्याला उद्या पुन्हा 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीकरिता यायला सांगितले आहे.

ncb
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात

मुंबई - क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा कारवाई सुरू केली. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चाटच्या आधारे एनसीबीने आज अभिनेत्री अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. तब्बल अडीच तासा चौकशी करण्यात आली. अनन्या दोन तास उशिरा आल्यामुळे आज पूर्ण चौकशी करता आली नाही. त्यामुळे, अनन्याला उद्या पुन्हा 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीकरिता यायला सांगितले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी
एनसीबी कार्यालयातून निघताना अभिनेत्री अनन्या पांडे

एनसीबीकडून कागदोपत्री चौकशी करण्यात आली. एनसीबीकडे असलेले पुरावे हे अनन्या पांडेला दाखवण्यात आले. अनन्या पांडेचा मोबाईल एनसीबीने ताब्यात घेतला असून या संदर्भात काही माहिती मिळते का, हे शोधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -सुखद लोकल प्रवास : डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घराचीही झडती घेतली. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. एनसीबीने अनन्या पांडेला (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.

एनसीबी कार्यालयाकडे निघताना अभिनेत्री अनन्या पांडे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून अनन्या पांडेच्या घराची झडती घेण्यात येत आहे. तसेच, अनन्या पांडेला आज एनसीबीने चौकशीकरिता कार्यालयामध्ये बोलवले. त्यानंतर एनसीबीची टीम शाहरूख खानच्या मन्नत या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापेमारी

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचे व्हाँट्सअप चॅट

आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीने ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.

'मन्नत'वर देखील एनसीबी दाखल -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी तपास करण्यासाठी एनसीबीचे एक पथक मन्नत बंगल्यावर दाखल दाखल झाले आहेत. दरम्यान, शहारुख खानने सकाळी ऑर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची भेट घेतली होती.एनसीबीकडून मन्नतची झाडाझडती सुरू आहे.

जाणून घ्या अनन्या विषयी -

अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच पती-पत्नी और वो, अंग्रेजी मिडीयम, खाली-पिली यासारख्या प्रसिद्ध चित्रपटात अनन्याने अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे तीने फिल्मफेअर अवार्डसह झी सीने अवार्ड देखील पटकावला आहे.

हेही वाचा -VIDEO : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पाडेंबरोबर एनसीबी कार्यालयात दाखल

Last Updated :Oct 21, 2021, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details